महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके.

 महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके.

आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज.

कोल्हापूर ता.27 : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर झाली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या समोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले.


            यावेळी प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका उपायोजना आणि नियोजन करते आहे. याचाच एक भाग म्हणून आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधन सामुग्रीच्या सर्व यंत्रणांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. पावसाळयापुर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक होर्डिंगवर, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर फोर्सचे 60 विद्यार्थी महापालिकेस आपत्ती काळात मदत करणार आहेत. शहरात कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असलेचे सांगितले.


            नदीमध्ये यावेळी प्रात्यक्षिका दरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातुन लाईफ जॉकेट, फायबर इनर व दोरच्या सहाय्याने कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रत्याक्षिक दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सोल्जर फोर्स व नॅशनल फायर कॉलेज कोल्हापूर संस्थेकडील स्वंयसेवकांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.


            यावेळी अति-आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रनभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, जयवंत खोत, ओंकार खेडकर, तांडेल भगवान शिंगाडे, मधुकर जाधव, अभिजित सरनाईक, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, प्रविण ब्रम्हदंडे, संग्राम पाटील, नितेश शिंगारे, सौरभ पाटील तसेच अग्निशमन विभागाकडील जवान, महाराष्ट्र सोल्जर फोर्स संस्थेकडील स्वंयसेवक उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.