शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करून देणार नाही.. प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष राजन कदम.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करून देणार नाही.. प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष राजन कदम.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
तिसरी ते बारावी शालेय अभ्यासक्रमात पुन्हा मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याचे आराखडा तयार केल्या कारणावरून संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे कारण या भारत देशामध्ये असणाऱ्या शूद्र आणि स्त्रियांचे शोषण थांबवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर
25 डिसेंबर 1927 रोजी जनसमुदायाच्या उपस्थितीत मनुस्मृतीच दहन करण्यात आले होते आता पुन्हा एकदा विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति समाविष्ट केल्यास आपल्या देशात पुन्हा स्त्रियांचे शोषण आणि सुधारणा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल म्हणून सरकारला आणि पाठ्यपुस्तक मंडळला आव्हान करण्यात येते की मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश केल्यास देशभरातील आणि राज्यातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन आंदोलन करून मनुस्मृतिदन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष राजू कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
Comments
Post a Comment