टस्कर हत्तीचा बंदोस्त करण्यात यावा हसणे ग्रामस्थांची मागणी.
टस्कर हत्तीचा बंदोस्त करण्यात यावा हसणे ग्रामस्थांची मागणी.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------------
राधानगरी तालुक्यातील हसणे येथे टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी हसणे ग्रामस्थांनी दाजीपूर येथील वन्यजीव अधिकाऱ्यांना एका निवेदन द्वारे केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की गेली पंधरा दिवस टस्कर हत्ती चंद्रगड मार्गे दाजीपूर जंगलामध्ये आला असून तो टस्कर हत्ती हसणे गावा तील देवराई मध्ये ठाण मांडून असल्याने हसणे गावातील शेतकऱ्यांची केळी बांबू फणस भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे तसेच गांगोबा मंदिराचा वर्धापन दिन दिनांक 24 ते 26 मे रोजी होणार होता त्यासाठी अमेरिका ऑस्ट्रेलिया सिडनी दिल्ली मुंबई पुणे नाशिक कोकण येथून माहेर वाशि न व चाकरमाने आले होते परंतु चंदगडहून आलेला ठस्कर हत्तीने धुमाकूळ घालत असल्याने त्या भीतीपोटी माहेर वाशि न चाकरमान्य निराशा झाल्याने हसणे ग्रामस्थांनी गांगोबा मंदिराचा वर्धापन दिन दिनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला असल्याने ग्रामस्थांनी आज दाजीपूर येथील वन्यजीव फॉरेस्ट ऑफिसचे प्रमुख यांना शिष्ट मंडळामार्फत जाऊन ठस्कर हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली असून यावेळी हसणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते
Comments
Post a Comment