बिथरलेल्या गव्याने चार चाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघेजण तर कोकणातील एक जण जखमी.
बिथरलेल्या गव्याने चार चाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघेजण तर कोकणातील एक जण जखमी.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी पासून जवळ असणाऱ्या माळगावकर यांच्या शेताच्या घराजवळ बिथरलेल्या गव्याने कोकणात जाणाऱ्या चार चाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघेजण तर कोकणातील एक जण असे तिघेजण जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या चार चाकी गाडी नंबर एम एच 09 जीएम 0762 या गाडीतील निलेश अर्जुन मर्गज रा. सिंधुदुर्ग व महेश श्रीकांत पाटील आकाश महेश पाटील हे दोघेजण कोल्हापूर असे तिघेजण कोकणात जात असताना राधानगरी नजीक असणाऱ्या माळगावकरांच्या शेताजवळ चार चाकी गाडी आली असताना बिथरलेल्या गव्याने या चार चाकी वाहनाला जोरात धडक दिल्याने या वाहनातील तिघेच जखमी झाले असून त्यांना वनरक्षक सूर्यकांत गुरव आकाश कुंभार वन कर्मचारी बाळू राठोड, कृष्णात वंजारे यांनी तातडीने या तिघांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
Comments
Post a Comment