राष्ट्रीय महामार्ग - तावडे हॉटेल येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन च्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन
राष्ट्रीय महामार्ग - तावडे हॉटेल येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन च्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
---------------------------------
आज बुधवार दि. 29 मे 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास तावडे हॉटेल येथे पंचगंगा नदी पुलाशेजारी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन च्या वतीने शासकीय पाणीपट्टी दरवाढ व कृषीपंपाना जलमापक यंत्र बसविणे विरोधात सर्वपक्षीय राष्ट्रीय महामार्ग रोको व चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु आचारसंहिता असल्याने पोलीस प्रशासनाने महामार्ग रोखण्यास परवानगी नाकारली.त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी सेवा रस्त्यावर दर्ग्यासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक मोर्चा चे भारत पाटणकर,आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील,आमदार अरूणदादा लाड,माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. या आंदोलनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. कृषीपंपाची शासकीय दहापट पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी.राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पध्दतीने पाणी वाटप करत नाही,तोपर्यंत कृषिपंपाना जलमापक मीटर ची सक्ती नको.शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिल शासन भरते आणि १९ टक्के शेतकरी त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी करावी.भ्रष्टाचार थांबवावा व २० टक्के लोकल फंड रद्द करावा. सवलतीच्या दराने पाणीपुरवठा व शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी.या मागण्यांचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर 6 जून नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शिरोली फाटा ते तावडे हॉटेल या पट्ट्यात शेतकरी वाहनासह मोठ्या संख्येने आल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.यावेळी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
Comments
Post a Comment