निसर्गाकडे चला , तो आपले जीवन आनंदी बनवेल- वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी.

  निसर्गाकडे चला , तो आपले जीवन आनंदी बनवेल- वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी.

 --------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनिधी 

 जोतीराम कुंभार

 --------------------------------

   सर्वांना मुक्त हस्ते भरभरून देतो तो म्हणजे निसर्ग तो सर्वात मोठा दाता आहे त्याच्याशी कृतघ्न होऊ नका . त्याला ओरबडू नका . कृत्रिम जीवनातून मिळणाऱ्या क्षणिक सुखाने मानवी जीवन यातनामय बनत आहे. निसर्गाकडे चला , तो आपले जीवन आनंदी बनवेल . असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले ते सावर्डे बु॥ (ता . कागल) येथे समाजभान फौंडेशनच्या वतिने आयोजित संस्कार शिबीरात शिबीरार्थींना मार्गदर्शन करतांना बोलत होते . कार्यक्रमास प्रा.के. बी. पाटील,पांडुरंग महाजन, सागर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री सुर्यवंशी यांनी प्रारंभी शिबीरार्थींना परिसरातील वृक्षांची माहिती दिली त्याचबरोबर रोप निर्मीती , वृक्षारोपण, डोंगरमाथी बियांची हवाई पेरणी याबाबत माहिती स्पष्ट केली तसेच शिबीरामध्ये असतांना बीया जमा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     स्वागत व प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले. तर आभार जगदीश कांबळे यांनी मानले 

   यावेळी अजित कांबळे, विठ्ठल पाटील, नंदकुमार हिरुगडे यांचेसह शिबीरार्थी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.