रिसोड येथे कृषी विभागाची खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न.
रिसोड येथे कृषी विभागाची खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------
रिसोड येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते यावेळी उपसंचालक शांती राम धनुडे, जिल्हा गुण नियंत्रक आकाश इंगोले , कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,भागडे, तालुका कृषी अधिकारी मदन तावरे, , कृषी अधिकारी पंचायत समिती सतीश मुंदडा, रिसोड तालुका कृषी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल बगडिया हे प्रामुख्याने उपस्थित होते .
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये म्हणून येथील कृषी विभागाच्या वतीने येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या आढावा बैठकीचे व प्रशिक्षणाचे आयोजन येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतूने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते केंद्र शासनाकडून नव्याने लागू करण्यात आलेल्या प्रमाणित बियाणे वितरण कार्यप्रणाली मध्ये साथी नावाने सुरू करण्यात आलेल्या पोर्टल विषयी सविस्तर माहिती जिल्हा गुणनियंत्रक आकाश इंगोले यांनी दिली. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांना दर्जेदार व वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात तसेच उगवण प्रमाणपत्र व स्त्रोत आपल्या परवान्यात समाविष्ट करूनच विक्री करावी असे आदेश जिल्हा गुण नियंत्रण गणेश गिरी यांनी दिले .शेतकऱ्यांनीही कृषी निविष्ठा परवानाधारक कृषी केंद्रातूनच खरेदी कराव्यात कृषी निष्ठांची पक्की देखे घ्यावीत खते व बियाण्यावरील माहिती वाचून घ्यावी व काही आक्षेप आढळून आल्यास शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाकडे तात्काळ संपर्क करावा याबाबत अधिक माहिती कृषी अधिकारी पंचायत समिती सतीश मुंदडा यांनी दिली तर घरगुती बियाणे वापरताना घ्यावयाची काळजी व उगवण क्षमता याबाबत सविस्तर माहिती तालुका कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी दिली याप्रसंगी भागडे यांनीही कृषी संचालकांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाला तालुक्यातील सर्व कृषी केंद्राचे संचालक तथा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment