कोयना धरणग्रस्त महासंघ यांचा अनोखा उपक्रम.
कोयना धरणग्रस्त महासंघ यांचा अनोखा उपक्रम.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोयना प्रतिनिधी
--------------------------
कोयना धरणग्रस्त महासंघ अनेक वर्षे आपल्या माध्यमातून लोकहिताचे उपक्रम राबवित असतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे या वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने महासंघाशी संलग्न असणाऱ्या चारही गावात लहान मुलांची निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अनेक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला होता.महासंघाच्या पदाधिकारी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थी यांना पारितोषिक देण्याचे योजले होते .त्यानिमित्ताने खिरखंडी गावच्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी कोयना धरणग्रस्त महासंघाचे पदाधिकारी खिरखंडी गावी उपस्थित झाले होते.खिरखंडी बौद्धजन विकास मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळ यांनी महासंघाच्या पदाधिकारी यांचे स्वागत केले आणि त्यांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमाचे कौतुक देखील केले लहान मुलांना बक्षीस वाटप केल्याबद्दल खिरखंडी ग्रामस्थांनी महासंघाचे आभार मानले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या या वेळी महासंघाचे पदाधिकारी मोहन सकपाळ, सुरेश कांबळे , सुधाकर कांबळे, नारायण लोखंडे तसेच खिरखंडी गावचे बौद्धजन विकास मंडळाचे सदस्य तसेच महिला भगिनी वयोवृद्ध लहान मूल उपस्थित होते.
Comments
Post a Comment