उचगावातील मनेर मळ्यात पन्नास हजारांची चोरी.

 उचगावातील मनेर मळ्यात पन्नास हजारांची चोरी.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------

गांधीनगर:- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपयांसह  मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद प्रकाश तानाजी कोनोजी (रा. इंद्रजीत कॉलनी मनेर माळ उचगाव ता करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.

प्रकाश कोनोजीसह कुटुंबीय हे रविवारी रात्री आपल्या घरातील खालच्या खोलीस कुलूप घालून बिल्डिंगच्या टेरेसवर झोपले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री साडेअकरा ते सोमवारी पहाटे च्या सुमारास घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. मधल्या खोलीतील कपाटा मधील ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने असा 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. पण थोड्या अंतरावर माग काढत श्वान तिथेच घुटमळले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.