पाणीटंचाई लक्षात घेता रिसोड नगर परिषदेने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे.

 पाणीटंचाई लक्षात घेता रिसोड नगर परिषदेने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

--------------------------------------

आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून रिसोड:नगरपरिषदेने उन्हाळ्यामध्ये पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शह्रातील प्रत्येक भागात आजच्या परिस्थितीत पाचव्या दिवशी रिसोड नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा होत असून आडोळ धरणावरून अन्य ठिकाणी सुद्धा पाणीपुरवठा होत आहे.सद्या स्थितीत रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ धरणात 22.टक्के पाण्याचा साठा शिल्लक असल्याचे नगरपालिका अभियंता यांनी सांगितले.

 मे व जून महिन्यात तापमानाचा पारा वाढण्याची दाट शक्यता असल्याने शहरात पाणीटंचाई जाणवण्याची दाट शक्यता असूनही रिसोड नगरपालिकेकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजन केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे रिसोड नगरपालिकेची निष्क्रियता व नियोजनशून्य कारभार असल्याची जाणवत आहे.शहराच्या प्रभागातील पाणीपुरवठा संदर्भात आढावा घेतला असता असता प्रभागातील अनेक नळाना तोट्या नसल्यामुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ वाहत असल्याचे निदर्शनास आले असून बरेच नळधारक आपलेे पाणी भरून झाल्यानंतर मोटरसायकल व गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करतात यावर निर्बंध घालण्याचे गरजेचे आहे.

रिसोड शहरात दिवसाढवळ्या पाण्याचा गैरवापर होत असून या गंभीर बाबीकडे पाणीपुरवठा विभागाचे साफ दुर्लक्ष होतांना दिसत आहे. आगामी दीड महिना शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी योग्य ते नियोजन करून पाणी व्यर्थ जाणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने फिरते पथक तयार करून ज्या दिवशी ज्या भागात नळ येतात त्या भागात या पथकाने फिरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नळधारकावर कारवाई करणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.