नाले सफाईतून आजअखेर 7297 टन गाळ उठाव फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व तत्सम 150 टन मटेरियल नाल्यातून काढले बाहेर.

 नाले सफाईतून आजअखेर 7297 टन गाळ उठाव फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व तत्सम 150 टन मटेरियल नाल्यातून काढले बाहेर.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी 

रजनी कुंभार 

----------------------------------------

कोल्हापूर ता.24 : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईतून आजअखेर 7297 टन गाळ उठाव करण्यात आला. यामध्ये पोकलॅण्ड मशीनद्वारे आजअखेर 1465 आयवा गाळ उठाव करण्यात आला. तर नाल्यातून फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व तत्सम 150 टन मटेरियल बाहेर काढण्यात आले आहे. या नाले व चॅनेल सफाईकरीता 2 पोकलँड मशिन, 2 जे.सी.बी., 6 हायवा डंपर द्वारे कामकाज सुरु आहे. याकामी 45 महापालिका कर्मचा-यांची 2 पथके तयार करण्यात आलेली आहेत. सदर मोहिमअंतर्गत पोकलँड मशिनद्वारे गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते महालक्ष्मी नगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल व वाय.पी. पोवार नगर ते हुतात्मा पार्क गार्डन ते ॲस्टर आधार हॉस्पीटल ते राजेंद्रनगर, श्याम सोसायटी नाला व हॉकी स्टेडियम ते रेणूका मंदीर या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता पुर्ण झालेली आहे. तर निकम पार्क ते मोरे मानेनगर, हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर पूल याठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु आहे. हि नालेसफाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


            आज सकाळी सहाय्यक आयुक्त-2 कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांनी देवकर पाणंद येथील श्याम हौसिंग सोसायटी व हॉकी स्टेडियम जवळील नाले सफाई व गाळ उठावाची समक्ष पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त-2 कृष्णा पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी नाले सफाई करुन गाळ उठाव करण्यात येत आहे अशा ठिकाणी स्थानिक नागरीक व सामाजिक संस्थांनी आपल्या काही सूचना असतील तर त्या आरोग्य विभागाच्या पथकास देण्याचे आवाहन केले आहे. यावेळी किटक नाशक अधिकारी स्वप्निल उलपे उपस्थित होते.


            तसेच महापालिकेच्यावतीने आज अखेर मनुष्यबळाद्वारे 65 प्रभागामधील एकुण 370 चॅनेल्स् सफाई पुर्ण झालेली आहे.  तर पोकलँड मशिनद्वारे 13 पैकी 8 मोठे नाले पुर्ण झाले असून 2 ठिकाणी काम सुरु आहे. जे.सी.बी मशिनद्वारे 206 पैकी 145  चॅनेल्स सफाई पुर्ण झालेली असून 1465 आयवा अंदाजे वजन 7297 टन इतका गाळ उठाव करण्यात आला आहे. तसेच मनुष्यबळाद्वारे शहरामधील मुख्य ड्रेनेज लाईन (मॅनहोल) 2200 पैकी 1919 ड्रेनेज लाईनचे सफाईचे काम पुर्ण झाले आहे. ही नाले व चॅनेलची सफाई महालक्ष्मी मंदीर परिसर, खोल खंडोबा परिसर, जाधववाडी, बावडा पॅव्हेलियन, जवाहर नगर, वर्षानगर, हनुमान मंदिर परिसर, कैलासगड स्वारी, पद्माराजे उद्यान, शुगर मिल, ताराबाई पार्क, चंद्रेश्वर, हॉकी स्टेडियम, मार्केट यार्ड, रमणमळा, शास्त्रीनगर, कॉमर्स कॉलेज, फिरंगाई तालीम, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, फुलेवाडी रिंगरोड, पांजरपोळ, बलराम कॉलनी, यादवनगर, रामानंदनगर, टाकाळा, तपोवन, टेंबलाईवाडी, मंगेशकर नगर, शिवाजी पार्क, सर्किट हाऊस, सदरबाजार, लक्षतीर्थ वसाहत, लाईन बझार, फुलेवाडी, तटाकडील तालीम, रंकाळा तलाव, विक्रमनगर, राजेंद्रनगर, राजारामपूरी 1 ते 5 वी गल्ली, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, संभाजीनगर, कदमवाडी, सिद्धाळा गार्डन, साईक्स एक्स्टेंशन, राजोपाध्येनगर, कसबा बावडा पूर्व, तुळजाभवानी, मुक्त सैनिक वसाहत, साळोखेनगर, कळंबा कारागृह, रायगड कॉलनी, सुर्वेनगर, रुईकर कॉलनी, नाना पाटीलनगर व कनेरकरनगर येथे करण्यात आली आहे. शहरातील उर्वरीत सर्व नालेसफाईचे कामकाज दि.31 मे 2024 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.