रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर ता.जावली येथे 36 वर्षानंतर पुन्हा भरली माजी वि‌द्यार्थ्यांची शाळा.

 रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर ता.जावली येथे 36 वर्षानंतर पुन्हा भरली माजी वि‌द्यार्थ्यांची शाळा.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 जावली  प्रतिनिधि 

शेखर जाधव

-----------------------------

 रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर ता. जावली येथिल सन १९८७-१९८८ च्या इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांचा स्नेहमेळावा २६ मे २०२४ रोजी वाघेश्वर हायस्कुल मध्ये संपन्न झाला. काळाच्या प्रवाहात निसटलेले मैत्रीचे हात पून्हा हातात आले तब्बल ३६ वर्षांनी शिक्षक विद्यार्थी व मित्र-मैत्रिणींची आगळी वेगळी भेट घडून आली. नियोजन होते स्नेहमेळाव्याचे. त्या बॅचचे सर्व शिक्षक ,नलगे सर,डुबल सर ,पुजारी सर ,शेडगे सर,शेडगे क्लार्क ,पाटील सर,तसेच मेरु विद्या मंदिर वाघेश्वर प्राचार्य जाधव सर,यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा पार पडला. 


या मेळाव्या दरम्यान शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून शाळेला ५१,०००/- हजार रू विद्यार्थी वर्गणीतून देण्यात आले.

 दिवंगत शिक्षकांची आठवण म्हणून शाळेच्या आवारात आंब्यांची तसेच वडाची,चिंचेच्या रोपट्यांची शाळा परिसरात रोपण करण्यात आले. शालेय जीवनातील गंमतीजंमती, गप्पा- गोष्टी-गाणी-डान्स- यांची बहारदार मैफिल सजली होती. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सारेच भावूक झाले.जुन्या आठवणीमधील खेळ ,विटी दांडू हा भावुक ठरला,माझी विद्यार्थ्यांनी विटी दांडू खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला


 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 

श्री. जगन्नाथ आर्डे भणंग 

श्री.अशिष जाधव भणंग 

श्री. शरद केंजळे केंजळ

श्री.कोंडीराम केंजळे केंजळ

श्री. राजेंद्र दुदुस्कर केसकर वाडी

श्री.सदिप जाधव केसकरवाढी 

श्री. शंकर सावंत चिंचणी 

श्री. संजय साळुंखे मोरावळे

,मिलिंद जाधव, बापू कदम व सर्व सहकारी मित्र परिवार ,

विशेष सहकार्य ,शंकर सावंत ,शिवाजी पवार चिंचणी


या सर्वांनी आपले योगदान दिले. सोहळ्यास सर्व माजी विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले. एकमेकांना अविस्मरणीय असा आठवणींचा ठेवा. देऊन जड पावलांनी मित्रमैञीनींनी शाळेचा निरोप घेतला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन - तुषार सावंत,प्रास्ताविक ,राजेंद्र दुदुस्कर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.