मिरज कुपवाड महापालिका कडून 30 विनापरवाना कॉफी शॉपना नोटीसा.

 मिरज कुपवाड महापालिका कडून 30 विनापरवाना कॉफी शॉपना नोटीसा.


---------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

---------------------------------

महानगरपालिकेकडून 30 विना परवाना कॉफी शॉप ना नोटीस देण्यात येणार आहे.

आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी विना परवाना कॅफे शॉप ना नोटीस देणार आहेत.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कडून मनपा क्षेत्रातील कॉफी शॉप चे तपासणी सुरू करण्यात आले आहे.

आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून आयुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये महापालिकेने 30 हून अधिक कॉफी शॉपची तपासणी पूर्ण केले आहे

महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॉफी शॉप चे तपासणी मोहीम हाती घेण्यात आले आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झाले आहे तपासणी मोहिमात महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॉफी शॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली त्याचबरोबर सदर कॉफी शॉप हे परवान धारक आहे की कि नाही तसेच कॉफी शॉप मध्ये अन्य कोणते घर प्रकार घडत आहेत का याबाबतचे सखोल माहिती या पत्रकारांकडून घेण्यात आली या 30 कॉफी शॉप च्या तपासणीमध्ये कॅप महापालिकेच्या व्यवसाय परवाना नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे अशा विनापरवाना सुरू असणाऱ्या कॉफी शॉप चालकांना सात दिवसाची नोटीस बजावणार आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे धनंजय कांबळे यांनी कर्मचारी सहभागी झाले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.