शिरोली यात्रेत शर्यतीवेळी नियमांचे उल्लंघन - 23 जणांच्यावर गुन्हा दाखल.
शिरोली यात्रेत शर्यतीवेळी नियमांचे उल्लंघन - 23 जणांच्यावर गुन्हा दाखल.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
----------------------------------
पुलाची शिरोली, ता.हातकणंगले येथे काशीलिंग बिरदेव यात्रा व पीर अहमदसो ऊरुसानिमित्त सोमवार दि.13 रोजी सकाळी 11 वाजता घोडागाडी, बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती शिरोली माळवाडी भागात घेण्यात आल्या होत्या. डबल घोडागाडी शर्यत सुटल्यानंतर या मार्गावर रस्ता डांबरी असल्याने घोडागाडी मधील घोड्याचा पाय घसरल्याने त्या पाठोपाठ येणारी घोडागाडी त्या घोड्यावर पलटली, तसेच दोन्ही घोडागाडी सोबत असणारे दु चाकीसार सुध्दा घसरुन पडून जखमी झालेत. या अपघाताची दृश्ये,व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात प्रसिद्ध झाले होते.याचबरोबर यात्रा कमिटीने फक्त बैलगाडी शर्यतीची परवानगी घेतली होती.विनापरवाना घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले होते.तसेच घोड्यांना निर्दयपणे वागणूक देऊन मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
बऱ्याच वर्षानंतर बंद असलेल्या शर्यतींना शासनाने परवानगी दिली आहे.ही परवानगी देत असताना प्राण्यांच्या सुरक्षेबाबत नियम व अटी शासनाने घालून दिल्या आहेत. या अटी, शर्तीचा भंग झाल्याने स्वतः पोलीस फिर्यादी होऊन शिरोली गावच्या सरपंच पदमजा करपे यांच्यासह एकूण 23 जणांच्या वर शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या सर्वाच्यावर कलम १८८,३३७,३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम १२९ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यास अधिनियम १९६० नुसार ११(१)(अ)प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस बी कोळी हे करत आहेत.
Comments
Post a Comment