अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मागणीत घट, दरातही घसरण, विक्री निम्म्यावर.
अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मागणीत घट, दरातही घसरण, विक्री निम्म्यावर..
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------------
रिसोड तालुक्यात एप्रिल महिन्यात मागील काही दिवसापासून सातत्याने तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दरात सुद्धा घसरण झाली असून विक्री देखील निम्म्यावर आली असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली.मागील काही दिवसांपूर्वी लहान थोरांपासून सर्वांना उन्हाळ्यात अगदी हवाहवासा वाटणारा फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला त्यामुळे प्रारंभी आंब्याचे दर प्रति किलो शंभरी पार होते परंतु त्यानंतर मात्र अवकाळीचे सावट आले आणि आंब्याचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलो वर येऊन पोहोचले. मागील आठवडाभर अवकाळी ढग असल्याने आंब्यांना फारशी मागणी नाही. दशहरी ,केशर, बदाम, , नंगडा व लालबाग अशा विविध जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले असून ग्राहकांना पूर्वी दशहरीसाठी प्रति किलो १०० , केशर साठी १३०, बदाम साठी १००, सटकुलस साठी ८०, नंगडा साठी १०० व लालबाग साठी १०० रुपये मोजावे लागत होते . परंतु आता मात्र आंब्याचे दर ५० ते ६०रुपये प्रति किलो आले तरीही ढगाळ वातावरणामुळे ग्राहकांनी आंबा खरेदी कडे पाठ फिरविली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आंबा विक्रेत्याकडून दर दिवशी जवळपास दीड ते दोन क्विंटल आंब्याची विक्री केल्या जात होती. परंतु आता मात्र ती निम्म्यावर आली असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment