वाठार बु.ता खंडाळा येथे छापा टाकून लोणंद पोलिसांनी केला ४९९५२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त.

वाठार बु.ता खंडाळा येथे छापा टाकून लोणंद पोलिसांनी केला ४९९५२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त.

-----------------------------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

लोणंद प्रतिनिधी 

वैभव शिंदे

------------------------------------------------------

 वाठार बु. ता. खंडाळा येथे लोणंद पोलीसांनी केली गुटख्याची कारवाई.

       याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २७/४/२०२४ रोजी संध्याकाळी ७.३६ वाजण्याचे सुमारास लोणंद पोलीस ठाणे अधिकारी श्री सुशिल बी. भोसले, व त्यांचे सहकारी पोलीस ठाणेकडील शासकिय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बी. भोसले यांना बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा याने त्याचे घराचे शेजारी असलेल्या शेडमध्ये अवैदय रित्या गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे त्या बातमीचे आधारे विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यांचे घराचे पश्चिम बाजुस असले पत्राचे शेडमध्ये अचानक रात्री ९.१५ वाजता छापा टाकला तेथे विशाल चंद्रकांत गाढवे वय ४१ रा. वाठार बु. ता. खंडाळा हा मिळुन आला. सदर शेडची झडती घेतली असता शेडमध्ये कुरकुरेच्या पुढयांचे खालील बाजुस लपवुन ठेवलेल्या ७ लहान मोठया गोणीमध्ये ४९९५२/- रुपये किंमतीचे गुटखा मिळुन आला आहे. सदर बाबत लोणंद पोलीस ठाणे भा.द.वि.सं. का. कलम ३२८, १८८, २७२, २७३ तसेच अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ चे कलम २६(२) (f). २६(२) (ii), २६(२) (iv), २७ (३) (d) ३८ (२) (a) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यामध्ये विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यास अटक करण्यात आले असुन त्यास खंडाळा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची दिनांक २९.०४.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

    सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार नितीन भोसले, धनाजी भिसे, महिला पोलीस प्रिया नरुटे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.