विदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे आदेश.

 विदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे आदेश.

----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

अमरावती जिल्ह्या प्रतिनिधी

पी एन देशमुख.

----------------------------------


अमरावती.

अमरावती विभागात ४८तासात झालेल्या वादळ सह अवकाळी व गारपिटीमुळे गहू, कांदा, केळी, आंबा, संत्रा व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत शासनाला प्राथमिक अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. वादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शिवाय अंगावर झाड पडल्याने एक बैल ठार झाला. रस्त्यावर झाले पडल्याने वाहतुकीचा कळंबा झाला तसेच वीस पुरवठाही खंडित झाला. महसूल विभागाची यंत्रणा निवडणूक कामाला व्यस्त असल्याने मदत कार्यात दिरंगाई होत असल्याचा आपणग्रस्तांचा आरोप आहे. "महावेध"च्या २४ तासात अहवालानुसार अमरावती जिल्हा सरासरी १३.३मीमी., यवतमाळ १६.५मीली, वाशिम १०.९मीली, अकोला ८.२,व बुलढाणा जिल्ह्यात ३.६ मिली पावसाची नोंद झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.