Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता मधील मतदान जनजागृतीचे विचार आजही आदर्शवत ः जिल्हाधिकारी अमोल येडगे

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता मधील मतदान जनजागृतीचे विचार आजही आदर्शवत ः जिल्हाधिकारी अमोल येडगे.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापुर जिल्हा परिषद 

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कोल्हापूर - सजग नागरिक म्हणून जबाबदारीने सामाजिक जीवनात कार्य करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचार हे नेहमीच सर्वांना आदर्शवत आहेत. त्या मधीलच मतदारांना इशारा म्हणून एक एक मत लाखमोलाचे - मत हे दुधारी तलवार, त्याची लावावी कसोटी सुंदर - सावधपणे ' हे व्यक्त केलेले विचार आजही सर्वत्र तंतोतंत लागू पडतात. त्याचा प्रसार व्यापकतेने व्हावा यासाठी हा दैनिक सिंधुदुर्ग समाचार व 90.4 मँगो एफ एम परिवाराचा उपक्रम नक्कीच सर्वत्र अनुकरणीय आहे अशा उपक्रमांना जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने नेहमीच सहकार्य केले जाईल असे सांगत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कार्यक्रमासाठीआपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.    

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग समाचारच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मतदारांना इशारा या मतदान जनजागृती विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले . प्रारंभी सर्वांचे स्वागत पुस्तके देऊन संपादक आशिष भाऊसाहेब कदम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग समाचार परिवाराने नेहमीच विविध कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे असे सांगताना दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकात रक्षाबंधन दिवशी पर गावातून मुक्कामास असलेल्या वाहक चालकांना भावपूर्ण वातावरणात राख्या बांधण्यापासून ते आजच्या मतदार जनजागृती अभियानापर्यंत विविध उपक्रमात त्यांचे सातत्य कायम असल्‍याचे नमूद केले. अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संदीप पाटील कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, शशिकांत पाटील, महावीर कॉलेज एनसस विभागाचे अंकुश बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले .

या सोहळ्यास जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे अमर पाटील, राजेंद्र मकोटे, जयसिंग हवालदार, सुलोचना नार्वेकर, तेजस्विनी पार्टे, रूपाली दानवे, सरिता सुतार, प्रभावती गायकवाड, अश्विनी गोपुडगे, सुनीता आगावकर, अनिल निगडे, रामकृष्ण डावरे, मोहन कमते यांच्यासह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर तालुका स्तरावरील विविध महाविद्यालय तसेच सामाजिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी या विशेषांकाचे वितरण करण्याचा मनोदय यावेळी संपादक आशिष कदम यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments