ध्रुमिल हर्षल जाधव या चिमुकल्या च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भणंग केंद्र शाळेस कुटुंबीयां कडून कपाट खुर्च्या टेबल हे साहित्य भेट.
ध्रुमिल हर्षल जाधव या चिमुकल्या च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भणंग केंद्र शाळेस कुटुंबीयां कडून कपाट खुर्च्या टेबल हे साहित्य भेट.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
शेखर जाधव
--------------------------------
भणंग :- देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्या ने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व या गुणांनी बहरलेले भणंग गावचे सुपुत्र श्री . हरिश्चंद्र जाधव यांचे चिरंजीव व स्नुषा सौ धनश्री हर्षल जाधव यांचा चिमुकला ध्रुमिल याचा आज पहिला वाढदिवस . प्रथमतः आपल्या शाळा माऊलीच्या प्रांगणात सर्व शालेय मुलांनी, गुरुजनांनी व ग्रामस्थांनी ध्रुमिलला ज्ञानरूपी आशीर्वाद दिले . हार्मोनियम व तबल्याच्या साथीने शुभेच्छांचे सूर बरसले . या निमित्ताने ध्रुमिलच्या कुटुंबियांनी शाळेच्या वाचनालयासाठी कपाट, टेबल व दोन खुर्च्या एवढे साहित्य वस्तुरूपाने दिले . नेहमीच या कुटुंबाकडून शाळेसाठी असणारा देणगीचा ओघ व दातृत्वाची देण याही वर्षी शाळेला एक प्रेरणादायी ठरली . उच्चशिक्षित असणाऱ्या हर्षल व धनश्री या दांपत्यांने मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले . आम्ही शाळेमुळेच घडलो. गावची मुले खुप शिकावीत, मोठी व्हावीत अशीही त्यांनी इच्छा व्यक्त केली. भणंग शाळा उपक्रमशील असल्याने भणंग शाळेचा आम्हांस अभिमान वाटतो. त्यांनी स्वतःच्या या कर्तृत्वाने मुलांसमोर एक आदर्श ठेवून भावी पिढी त्यांचाच हा वसा पुढे चालु ठेवावा अशी आशा व्यक्त केली
Comments
Post a Comment