पाण्याच्या शोधार्थ आलेल्या वानरावर कुत्र्यांच्या हल्ला : वानराचा मृत्यू.
पाण्याच्या शोधार्थ आलेल्या वानरावर कुत्र्यांच्या हल्ला : वानराचा मृत्यू.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
आंबदास पवार
-------------------------------
आजघडीला उन्हाळा तीव्र झाला असून अनेक ठिकाणचे जलसाठे कोरडेठाक पडल्याचे दिसून येत आहेत. वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधार्थ जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे. दि. ९ रोजी वानर लोहा शहरातील शिक्षक काॅलनी परिसरात आले असता जवळपास सात ते आठ कुत्र्यांनी वानरावर हल्ला चढवला त्यात वानर जागीच मृत पावले. सदरील घटना रामभक्ताना समजताच त्यांनी मृत वानरावर हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.या वेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष लोकप्रिय नगरसेवक भास्कर दादा पवार श्री बागेश्वर धाम सेवा समितिचे अध्यक्ष अंबादास पाटील पवार, गणेश पाटील कल्याणकर, शिवराज पाटील मुंडकर, गणेश मोरे, सदस्य राजेश पाटिल कुटे, ओमकार खोडवे, बबन पवार, सूरज कहाळेकर, संदीप पांचाळ, नागनाथ शिराळे, व्यंकट बांदेवार, मुद्रा पवार, अक्षय पोले, कुलदीप सोनवळे, प्रसाद देशमुख, कृष्णा धोंडगे, चंद्रशेखर शेंडगे, साजीद शेख आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment