ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्धार.
ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्धार.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
----------------------------------------
ईपीएस 95 पेन्शन धारकांची सविचारी सभा रविवार दि . १४ / ०४ / २०२४ रोजी दुपारी एक वाजता वाई मंडई येथे सपन्न झाली . सदर सभेस श्री अप्पा कुलकर्णी , श्री गोपाळ पाटील , यांनी मार्गदर्शन केले .
सभे मध्ये सध्याचे केंद्र शासनाने पेन्शन धारकांची केलेली अवहेलना या विषयी विचार विनिमय झाला . तसेच वारंवार आदोलन करून निवेदन देऊन सुद्धा सध्याचे केंद्र शासनाने भाजप शासनाने कर्मचाऱ्याची दिशाभूल केली आहे . यावर सर्वाचे एकमत झाले व भाजप व त्यांचे मित्र पक्ष यांना कोणत्याही परिस्थितीत मतदान करावयाचे नाही या बाबत एक मताने ठरविण्यात आले .
श्रीकांत पंडीत , श्री सुनील गोळे , श्री . डी .एल. सपकाळ , कॉम्रेड शिवाजी पवार , कॉम्रेड दिग्विजय पवार,यांनी आपले विचार व्यक्त केले . श्री बाळा साहेब पवार , कॉम्रेड प्रमोद परमणे , कॉम्रेड शंकर पवार , श्री गजानन लंगडे , श्री सुरेश पारखे , श्री नारायण बरकडे , विवेक सुर्यवंशी इत्यादी विविध आस्थापनातील सेवा निवृत्त पेन्शनधारक उपस्थित होते .
Comments
Post a Comment