शेतकरी कुटुंबातील डॉ केतन बनला आयपीएस अधिकारी
शेतकरी कुटुंबातील डॉ केतन बनला आयपीएस अधिकारी.
--------------------------------------------------
रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर
--------------------------------------------------
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील मूळचे येवता येथील शेतकरी कुटुंबातील वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी डॉक्टर अशोक इंगोले आणि सुनीता इंगोले हे वैद्यकीय व्यवसायासाठी रिसोड येथे स्थायिक झाले असून एका शेतकरी कुटुंबातील आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन पहिल्याच प्रयत्नामध्ये केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेमध्ये देश पातळीवर डॉक्टर केतन यांनी आपले स्थान पटकाविले आहे.
डॉक्टर केतन हे मूळचे रिसोड तालुक्यातील येवता येथील असून त्यांचे कुटुंब हे रिसोड येथे स्थायिक झाले आहे.
डॉक्टर केतन यांचे प्राथमिक शिक्षण हे रिसोड येथे झाले असून आपले वैद्यकीय शिक्षण त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले आहे.
आई-वडिलांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन डॉक्टर केतन यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवले आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक अधिकारी बनून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा डॉक्टर केतन यांचा मानस होता त्या अनुषंगाने त्यांनी परीक्षेची तयारी केली आणि परीक्षा दिली सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले असून त्याचे संपूर्ण श्रेय आहे आपले आई-वडील शिक्षक गुरुजन व नातेवाईक यांना दिले असून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा मी करणार असल्याचे डॉक्टर केतन यांनी सांगितले.
अभ्यासामध्ये सातत्य आणि कठोर परिश्रम केले की यश नक्की मिळते. त्यामुळे प्रत्येकाने सातत्य ठेवून हार न मानता प्रयत्न करत रहावे असा संदेश त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
डॉ केतन अशोक इंगोले
Comments
Post a Comment