नागाव येथे सत्यजित आबांच्या फेरीला उस्फूर्त प्रतिसाद :- सर्वाधीक मताधिक्य देण्याचा निर्धार.
नागाव येथे सत्यजित आबांच्या फेरीला उस्फूर्त प्रतिसाद :- सर्वाधीक मताधिक्य देण्याचा निर्धार.
----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
----------------------------
नागाव,ता.हातकणंगले येथे बुधवारी सकाळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील(आबा) यांच्याप्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ९ वाजता नागाव फाटा येथून फेरीला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर ग्रामदैवत श्री खणाई देवीचे दर्शन घेण्यात आले.त्याचबरोबर समतानगर येथील विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.संपूर्ण गावातून प्रचार फेरी काढून फेरीची सांगता संभाजीनगर येथील भोसले फार्म हाऊस येथे करणेत आली.
यावेळी उमेदवार सत्यजित पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या मागे उभे रहावे, असे आवाहन केले..
यावेळी पंचायत समिती माजी उत्तम सावंत यांनी नागाव मधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
काँग्रेस आमदार राजूबाबा आवळे,माजी आमदार सुजित मिणचेकर, राजीव आवळे,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हापरिषद माजी सदस्य महेश चव्हाण,शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे,शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य अनिल खवरे,भगवान जाधव, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, अन्सार देसाई, विभागप्रमुख भिकाजी सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्रेयस नागावकर,अमित खांडेकर, अक्षय कांबळे,विवेक नागावकर,उमाशंकर कोळी,तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील,संजय वडार , अशोकराव मगदूम , दिपक लंबे,महंमद मुल्लानी, रॉबिनसन लंबे ,संजय राठोड , तानाजी पोवार , संजय वडार,सुमित माळी यांच्यासह महाविकास आघाडी चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment