मालेगाव येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रचार सभेला उपस्थित राहावे.माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर गजाननराव हुले

 मालेगाव येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रचार सभेला उपस्थित राहावे.माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर गजाननराव हुले

------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

------------------------------

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी 

*वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक आंदोलनच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्कल पदाधिकारी, ग्रामशाखा, पदाधिकारी, जि प सदस्य प स सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधु भागीनी यांना आवाहन करण्यात येते की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर शुक्रवार दि 19 एप्रिल 2024 रोजी अकोला लोकसभा मतदारसंघातील मालेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये रिसोड मालेगाव विधानसभा तील मतदार हे यावेळी निर्णायक ठरू शकतात त्यामुळे या हर्षल मालेगाव विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे व या रिसोड मालेगाव मध्ये मधून वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा वंचित बहुजन आघाडीची सर्व धुरा इथूनच म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघातून चालवल्या जाते त्यामुळे रिसोड मालेगाव तालुक्यातील मतदार हे बाळासाहेब आंबेडकर साठी निष्ठावांत असल्याचे बोलले जात आहे या वेळी वाशीम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विशेष करून रिसोड मालेगाव विधानसभेतील सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी दुपारी 5 वाजता मालेगाव बस स्टॅन्डच्या बाजूला बाळासाहेब साहेबांच्या प्रचार सभेला हजारोच्या संख्येने सहभागी व्हायचे आहे. आपण सर्वजण  हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर गजाननराव हुले व जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे यांनी केले आहे.*

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.