बंद अवस्थेत असलेल्या बालाजी साखर कारखान्याच्या परिसरात आग.
बंद अवस्थेत असलेल्या बालाजी साखर कारखान्याच्या परिसरात आग.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित.ठाकुर
----------------------------------
तालुक्यातील मसला येथील बंद अवस्थेत असलेल्या बालाजी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आग लागल्याने ग्रामस्थांमध्ये एकच धावपळ उडाली.एकेकाळी नावारूपास आलेला व परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा तसेच गाळपाच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेला रिसोड तालुक्यातील मसलापेन परिसरात मोठ्या थाटात बालाजी सहकारी साखर कारखाना उभा असून मागील कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे कारखान्याच्या परिसरात गवत, झुडपे व काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.बालाजी सहकारी साखर कारखान्याची दुरावस्था झाल्यामुळे ती एक शोभेची वस्तू बनली आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात गवत, झुडपे व काटेरी वनस्पती वाढत असल्याने कारखान्याला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.परिसरातील गवत व काटेरी झुडपाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली तसेच आग कारखान्यात न शिरल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.कारखान्याच्या परिसरात आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला संपर्क करून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचवून आग आटोक्यात आणली.आगीने एवढे रुद्ररूप धारण केले होते की, यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याचे, गुराढोरांच्या चाऱ्यांचे व वनीकरणातील झाडे जळून खाक झाली.कारखान्याच्या परिसरात आग लागल्याचे कळताच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
Comments
Post a Comment