तिरंगी लढतीत बाळासाहेब आंबेडकरांचे पारडे जड.... सय्यद अकील वंचित ता. अध्यक्ष.

 तिरंगी लढतीत बाळासाहेब आंबेडकरांचे पारडे जड.... सय्यद अकील वंचित ता. अध्यक्ष.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकूर 

-------------------------------

-वंचित बहुजन आघाडी अकोला लोकसभा मतदार संघात आघाडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच भावी खासदार होतील असा दुर्दैम्य आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांनी दैनिक महासागर च्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत 2019 च्या निवडणुकीत सुद्धा सय्यद अकील यांनी कामं केलं.2019 आणि 2024 या दोन निवडणुकीत प्रचंड बदल झाला असून झालेला बदल हा बाळासाहेबांसाठी अतिशय पूरक ठरला आहे. महाविकास आघाडी सोबत जाण्याची बोलणी फिस्कटली आणि बाळासाहेबांनी स्वतंत्र लढण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तिरंगी लढत होऊन बाळासाहेबांचा विजयाचा मार्ग सुकर होणार.

 अकोला लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीचे मतदान 2019 च्या तुलनेत वाढले आहे.मागच्या पेक्षा बाळासाहेबांना दोन लाख मते अधिक मिळतील असा अभ्यासपूर्ण तर्क सय्यद अकील यांनी व्यक्त केला.2019 मध्ये बाळासाहेबांना बौद्धेतर मतदारांची मते फार कमी मिळाली होती परंतु 2024 मध्ये बौद्धेतर समाजाची मते मोठया प्रमाणात मिळाली. प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मोठ्या संख्येने मतदान करवून घेताना दिसला राजकीय नेतृत्वाने जरी आघाडी करण्यासाठी टाळाटाळ केली असली तरी गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्याने बाळासाहेबांसाठी मतदान मागताना कोणतीही कसर सोडली नाही त्यामुळे बाळासाहेबासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला संसदेत जाण्याची संधी मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त वंचित घातकातील लोकांनी बाळासाहेबांना विनाशर्त मतदान केले त्यामुळे प्रत्येक गावात बाळासाहेबांना प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचे मते मिळाली असा युक्तिवात सय्यद अकील यांनी करून बाळासाहेबच 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत निवडून येणार असा ठाम निश्चय व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.