राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारकाची आत्महत्या
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारकाची आत्महत्या.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारक अमर विलास आयरे वय वर्ष 54 यांनी दवाखान्यातील राहत्या कॉटर्समध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपले. आज सकाळी ही घटना उघड झाली याबाबत घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, परिचारक अमर आयरे मुळगाव जुना बुधवार पेठ, कोल्हापूर हे गेले मागील बारा ते पंधरा वर्षे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून सेवेत आहेत.मागील दहा वर्षापासून ते दवाखान्यातील कॉटर्समध्ये पत्नी व मुलासह राहत आहेत. आज सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला नायलॉनची रस्सी बांधून जीवन संपवले. या घटनेमागचे नेमके कारण समजलेले नाही. याबाबतची फिर्याद आयरे यांचे मेहुणे गजानन कृष्णा भोई राहणार गारगोटी यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. याबाबत राधानगरी पोलीस अधिक तपास करित आहेत.
Comments
Post a Comment