ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी सौ.दिपाली पाटील व सुधीर कुरळे यांची निवड.

 ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य पदी सौ.दिपाली पाटील व सुधीर कुरळे यांची निवड.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

---------------------------------

u

  कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी सौ.दिपाली रमेश पाटील (मडुर ता.भुदरगड) व सुधीर शिवाजी कुरळे(गारगोटी ता.भुदरगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे .


 जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्या आदेशाने नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्यात आली असून यामध्ये ग्राहक संघटना,वैद्यकीय,व्यापार,शेतकरी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे समितीचे सचिव असणार आहेत . 


या परिषदेमध्ये सौ.पाटील व कुरळे यांची व्यापर व उद्योग क्षेत्र प्रतिनिधी म्हणून यांची नेमणूक करण्यात आली आहे दिपाली पाटील व सुधीर कुरळे हे गेले पाच सहा वर्ष ग्राहक कल्याण फाऊंडेशनमध्ये कार्यरत आहेत.या निवडीकामी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे संस्थापक अरुण यादव यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.