उंचगाव यात्रा काळामध्ये अखंडीत विज पुरवठा करावा - करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

 उंचगाव यात्रा काळामध्ये अखंडीत विज पुरवठा करावा - करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

उंचगाव मंगेश्वर मंदीराची त्रेवार्षीक यात्रा ही दिनांक १९ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल२०२४ रोजी संपन्न होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. तसेच यात्रा काळामध्ये ही मुख्य मंदीरासह प्रत्येक घरावरती विद्युत रोशनाई होत असल्याने विजेच्या पूरवठयावर लोड येण्याची शक्यता असल्याने विज पुरवठा खंडीत होऊ शकतो. त्याबाबत आपण अतिरिक्त विजेचा ट्रान्सफॉर्मसह, अतिरित्त साहित्य यात्राकाळामध्ये आपण आपल्या कार्यालयामध्ये उपलब्ध ठेवावे. जेणे करून विज खंडीत झाल्यानंतर तात्काळ आपणास दुरूस्त करता यावी. याबाबत आपण सतर्क राहून आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी वारा सुटून झाडांच्या फाद्यांमुळे विज खंडीत होणार त्या झाडांच्या छाटणीसह कमकुवत फ्युजासह वायरी बदलुन घेणेबाबत आपण सर्वे करावा व कोरोनाच्या आजारानंतर होणाऱ्या उचगांवातील यात्रा काळात विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच कोणकोणते वीज कर्मचारी हे कोणत्या भागात व रात्र पाळीला असतील त्यांची नावे व फोन नंबर ग्रामपंचायत कडे द्यावेत अशी मागणी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केली.*

    *या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा.अमोल गायकवाड,साहाय्यक अभियंता विज वितरण कार्यालय उंचगाव यांना देण्यात आले.*

    *यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणते कर्मचारी कोणत्या भागात आहेत त्यांचे नाव व फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करुन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.*

  *यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाधिकारी सुनिल चौगुले, तालुकाधिकारी योगेश लोहार, शरद माळी, वाहतूक सेना उपतालुका प्रमुख दत्ता फराकटे, अजित पाटील, आबा जाधव, बंडा पाटील, दादासो यादव.*

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.