रखरखत्या उन्हात पाण्यावाचून जनावरांची त्राही-त्राही,त्यांच्यासाठी सुविधा व्हावी.

 रखरखत्या उन्हात पाण्यावाचून जनावरांची त्राही-त्राही,त्यांच्यासाठी सुविधा व्हावी.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

-------------------------------------

 :-जल ही जीवन हैl जल है तो जहाँ है l पाणी आहे तरच सजीव सृष्टी आहे. ही अशी अनेक सुभाशीत आपण शालेय पुस्तकातून नेहमीच वाचत असतो किंवा विविध कार्यक्रमातून ऐकत असतो.पाणी हे माणसासह सर्व सजीवांना अवश्यक आहे. माणसाला पिण्याच्या पाण्याची सुविधा नळाद्वारे अगदी घरापर्यंत नव्हे घरातील प्रत्येक खोली खोली पर्यंत आली आहे. प्रवासात असाल तर कुठेही पाणी सहज उपलब्ध होते अर्थात पैसे देऊनच. किंवा माणसांवर दया दाखविणारे खूप दानशूर व्यक्तिमत्व कोणाच्या तरी स्मुर्ती प्रित्यर्थ किंवा सौजण्याने पानपोई सुरु करतात आणि पुण्य कमावतात आणि त्यांच्या या सत्कार्याबद्दल त्यांना पुण्य मिळालही पाहिजे. परंतु माणसाएवढीच सर्वच मुक्या जनावरानाही रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे परंतु मुक्या जनावरांना माणसासारखं पाणी मागून उपलब्ध करता येत नाही किंवा विकतही घेता येत नाही ते निसर्गता उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्यावर अवलंबून असतात ते ही उन्हाळ्यात कोरडेठण पडलेले असतात त्यामुळे प्राण्यांची मोठी तारांबळ होते.जंगलात राहणारे प्राणी पाण्याच्या शोधात स्वतःच्या अधिवासापासून कोसोदूर स्थलांतरित होतात.गावा शहरात असणारे सर्व छोटे मोठे प्राणी यांनाही समाजातील दानशूर व्यक्तींनी वर्दळीच्या ठिकाणी हौद उभारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी जणेकरून एवढ्या तळपत्या उन्हात त्यांना सहज पाणी उपलब्ध होईल.शहरात हजारोच्या संख्येने मोकाट जनावरे भटकंती करित असतात.या सर्व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किमान मे आणि जून या दोन महिन्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांनी करावी आणि समाजातील दानशूर व्यक्तीचे सहकार्य घावें.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.