ट्रेलर चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.
ट्रेलर चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
---------------------------------------
सोमवारी रात्री गोकाक,कर्नाटक येथून एक्स्पोर्ट चे मटेरियल घेऊन नितीन ट्रान्सपोर्ट कंपनीचा,जे एन पी टी एम येथील एच ४३ बी जी १६२१ या नंबर चा ट्रेलर घेऊन ट्रेलर चालक मोहमद वसीक हा जे एन पी टी, न्हावाशीवा,नवी मुंबईकडे निघाला होता. आज सोमवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 8 च्या सुमारास शिरोली एम आय डी सी येथील एच एम टी फाटा येथे मारुती सुझुकी शोरूम जवळ हा ट्रेलर आला असता अचानक छातीत जोरदार कळ येऊन या ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा चालक मूळचा उत्तरप्रदेश येथील संत कबीर नगर येथील आहे.अशा मृत्यूसमयी सुद्धा या चालकाने प्रसंगावधान राखून ट्रेलर बाजूला घेऊन हँड ब्रेक दाबला.सकाळ च्या दरम्यान एम आय डी सी कामावर येणाऱ्या लोकांची गर्दी असते, चालकाने ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला.अचानक जागेवर जोरात ब्रेक दाबल्याने मोठा आवाज आला.आवाज ऐकून स्थानिक लोकांनी गाडीकडे धाव घेतली. चालकाला खाली घेऊन गाडी रस्त्यावरून बाजूला केली.खाली घेतल्यानंतर चालक मयत झाल्याचे समजले. थोडयावेळाने याच ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोकाक वरून मुंबई कडे जाणाऱ्या गाड्या या परिसरात आल्यानंतर गाडी इथे का थांबली आहे, हे बघण्यासाठी उतरले असता त्यांना सदर घटना कळली.या कंपनीचे या मार्गावर ठराविक थांबे आहेत.त्यामुळे गाडी या ठिकाणी कशी काय थांबली याची शंका आल्याने त्याचे सहकारी याठिकाणी थांबले.त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सी पी आर येथे नेला. या घटनेची नोंद अद्याप झाली नव्हती.
Comments
Post a Comment