भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त सलग अठरा तास साखळी वाचन उपक्रम.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त सलग अठरा तास साखळी वाचन उपक्रम.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-----------------------------------
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 13 एप्रिलला सलग अठरा तास साखळी वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. सकाळी 5 ते रात्री 11वाजेपर्यंत हा वाचन उपक्रम राबविण्यात येणार आहे.या वाचन उपक्रम समितीचे सदस्य जयंत वसमतकर यांच्या संकल्पनेतून व प्रा. कमलाकर टेमधरे यांच्या सहयोगातून व समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी समिती सदस्याकडे 12 एप्रिल च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आपण सकाळी 5 ते रात्री 11वाजेपर्यंत कोणत्या वेळेत वाचणासाठी याल आणि किती तास वाचन कराल याची नोंद करणे आवश्यक आहे. किमान एक तास वाचनालयातील कोणत्याही आपल्या आवडीनुसार वाचन करता येईल. वाचकाने निर्धारित केलेल्या वेळेत ती आसनव्यवस्था त्यांच्यासाठीच राखीव राहील. महिला व मुलींसाठी वाचणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे तसेच वाढते तापमान लक्षात घेता कुलरची व्यवस्था असणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावर ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.ज्यांनी आयुष्यभर वाचन करून कणाकणाने ज्ञान वेचून ज्ञानसागर झाले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सामाजिक क्रांती घडवून आणली त्या महापुरुष व महामानवाची जयंती वाचून करण्याचा संकल्प वाचन उपक्रम समितीनी घेतला आणि डॉ.बाबासाहेबाना अभिवादन म्हणजे त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार तळागाळातील माणसांना स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी करावा या उद्देशाने वाचनाने बाबासाहेब किंवा अन्य महापुरुष समजून घेण्यासाठी वाचन हेच प्रभावी माध्यम असल्याचे बुद्धिवंताचे मत आहे. म्हणून समाजातील प्रत्येक सुज्ञ व जबाबदार नागरिकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना किमान एक तास वाचन करून अभिवादन करावे असे आवाहन वाचन उपक्रम समितीच्या सदस्यांनी केले आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण रवि अंभोरे 9763601163, प्रा. कमलाकर टेमधरे 9765065990, जयंत वसमतकर 7507673955, प्रा.प्रवीण हाडे 9765747633,प्रा. शालिकराम पठाडे 9822410128, गजानन बाजड 9689815288, चाफेश्वर गांगवे 9096675001,काशिनाथ कोकाटे 8669050261, जगन्नाथ ठोंबरे माजी सैनिक 9764788249यांच्याशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment