पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर.

 पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड  प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर.

------------------------------

प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवी श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 श्री उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय येथे शनिवार व रविवार दिनांक 4 व 5 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन मुंबई अंतर्गत संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, मुंबई, समता सर्वस्व कॅन्सर सेंटर, आरोग्य विभाग वाशीम, हिंगोली व बुलढाणा तसेच डॉक्टर असोसिएशन रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून या शिबिरामध्ये प्रामुख्याने 

सर्व प्रकारचे कर्करोग म्हणजेच कॅन्सर, गुडघ्यांचे व खुब्याचे प्रत्यारोपण म्हणजेच नी व हीप जॉईंट रिप्लेसमेंट, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातील.

     सर्व प्रकारचे कॅन्सर मध्ये जसे की, स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर, यांची मॅमोग्राफी व्हॅन मधील स्क्रीनिंग मशीनद्वारे परीक्षण करण्यात येईल. स्त्रियांच्या गर्भाशयाचा कर्करोग म्हणजेच सर्वाइकल कॅन्सर मध्ये स्त्रियांच्या स्त्रावाचे pap smear द्वारे परीक्षण करण्यात येईल. मुख कर्करोग म्हणजेच तोंडाचा कॅन्सर रुग्णाचे 

अत्याधुनिक डेंटल व्हॅन मध्ये स्क्रीनिंग द्वारे परीक्षण करण्यात येईल. फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे लंग कॅन्सर,घशाचा कॅन्सर,अन्ननलिकेचा कॅन्सर, शरीरावर नवीन गाठ येणे,गुदद्वाराचा कॅन्सर व इतर सर्व प्रकारचे कॅन्सर आजारांचे निदान व उपचार करण्यात येतील. साधारणतः पुढील लक्षणे असल्यास कृपया रुग्णांनी आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे या मध्ये खूप जास्त घाम येणे, रात्रीला खूप जास्त ताप येणे,दीर्घकाळ वारंवार चक्कर येणे. 

दीर्घकाळ अशक्तपणा,वजनात अचानक घट होणे या लक्षणांचा समावेश आहे.गुडघ्याचे व खुब्याचे आजार म्हणजेच नी व हिप जॉईंट

गुडघ्याचे व खोब्याचे जॉईंट्सच्या आजारांचे तज्ञांद्वारे निशुल्क निदान व मुंबई येथे निशुल्क ऊपचार म्हणजेच प्रत्यारोपण करण्यात येईल.

 गुडघ्यांमध्ये अथवा खुब्यामध्ये किंवा आसपासच्या भागात लक्षणीय वेदना असल्यास, कडकपणा असल्यास, सूज येत असल्यास व हालचाल होत नसल्यास,एका पायावर उभे राहण्यास अडचण येत असल्यास, चालताना लंगडेपणा जाणवत असल्यास.

नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

       शिबिरामध्ये निदान झालेल्या रुग्णांचे मोफत उपचार मुंबई, संभाजीनगर येथील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांद्वारे करण्यात येणार आहेत.

       ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन अंतर्गत संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तर्फे रिसोड शहरामध्ये आतापर्यन्त चार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये विविध आजारावर तील 1000 50 रुग्णांची तपासणी करून 460 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल,श्री मधूसुधनजी अग्रवाल व श्री मन्नालालजी अग्रवाल हे बंधु स्थानिक रिसोड चे असून आपल्या मातृभूमीचे ऋण म्हणून ते रिसोडकरांची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करीत असतात. सामाजिक धार्मिक, आरोग्य व शिक्षण क्षेत्रामध्ये या तिन्ही बंधूंचे मोठे योगदान असून कोविड काळात संपूर्ण रिसोड तालुक्यातील नागरिकांचे निशुल्क लसीकरण करून नागरिकांना जीवदान दिल्याने रिसोडकर यांच्याकडे संकटमोचंक म्हणूनच बघतात. पुरुषोत्तमजी अग्रवाल यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असून या अमृतमहोत्सवी वर्षात आरोग्य शिबिरासह इतर समाजसेवी कार्य होणार असून तिन्ही बंधूंना दीर्घआयुष्य व चांगले आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी रिसोड चे नागरिक प्रार्थना करिता असतात.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.