राधानगरी पोलीस ठाण्यात आवारात दिवसाढवळ्या चोरी,सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल लंपास.

 राधानगरी पोलीस ठाण्यात आवारात दिवसाढवळ्या चोरी,सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल लंपास.

-------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

   राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारातील एका राहत्या घरात आज सोमवारी सायंकाळी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली सुमारे वीस हजाराची रोख रक्कम आणि आठ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले 

रविवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राधानगरी येथे भरणारा आठवडा बाजार बंद होता.सोमवारी बाजार सुरू ठेवण्यात आला होता.राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारात सचिन वागवेकर यांचे राहते घर आहे.वागवेकर पत्नी आणि मुलांसह सायंकाळी पाचच्या सुमारास बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेले होते.दरम्यान चोरट्यांनी गेटच्या व दरवाज्याचं कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडून तिजोरी मधील सुमारे वीस हजार रुपये रोख आणि सतरा तोळे सोने असा दहा लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल लांबवला

.दिवसाढवळ्या राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारात धाडसी चोरी झाल्याने नागरीकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.राधानगरी पोलिसांनी डॉग पथकासह ठसे तज्ञांना पाचारण केले 

या घरफोडी मध्ये स्थानिक चोरट्याने चोरी केली असल्याचे समजते

अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व पोलीस पाटील अनिल संकपाळ पोलीस कर्मचारी करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.