केंद्रप्रमुख काकडे यांची स्वामी विवेकानंद विद्यालयाला शैक्षणिक भेट.

 केंद्रप्रमुख काकडे यांची स्वामी विवेकानंद विद्यालयाला शैक्षणिक भेट.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

-------------------------------

तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड येथे चिखली केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश काकडे यांनी दि.6 एप्रिलला शैक्षणिक भेट दिली. स्वामी विवेकानंद विदयालयाचे प्राचार्य एस डी जाधव यांनी काकडे यांचे स्वागत केले. या शैक्षणिक भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या तसेच शाळेच्या परिसरात येत्या काळात वृक्षारोपण करून यापूर्वी लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.तसेच आपल्या शाळेतील सर्व भिंतीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन होण्यासाठी व अध्ययन प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी रंगीत चित्र काढून बोलक्या भिंती करण्यास सांगितले.विदयालयाला असलेली पक्की इमारत,भव्य मैदान,आवश्यक भौतिक साधन सुविधा व चांगली विद्यार्थी पटसंख्या याविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. काकडे यांची नव्याने केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची विद्यालयाला पहिलीच भेट असल्यामुळे विद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले प्रसंगी प्राचार्य एस डी जाधव सह सहाय्य्क शिक्षक जे.पी भिसडे,एन.पी वाघ, आर.एम अंभोरे,डी.ए मांडे, प्रा. गजानन लांभाडे, प्रा.अमोल देशमुख, गजानन घाटोळ, रामेश्वर पवार,गणेश हेंबाडे, कु. दुर्गा घोगरे शिक्षकेत्तर कर्मचारी रमेश पडघान,नरेश बचाटे, गणेश बनसोड, भारत माकोडे इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.