Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मतदान करा...लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे आव्हान.

 मतदान करा...लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे आव्हान.

-----------------------------

फ्रंटलाईन  न्यूज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-----------------------------

 लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  चिंचोलकर साहेब यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 स्वतः बंदोबस्तामध्ये व्यस्त असून निवडणुकीच्या कामकाजामध्ये व्यस्त असून वेळातला वेळ काढून त्यांनी जाऊन मतदान केले आहे.

 भारताची लोकशाही ही  जगातील सर्वात जुनी लोकशाही असून जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.


 भारतीय लोकशाहीने  जगासमोर एक लोकशाहीचा आदर्श घालून दिला आहे.

 भारतातील निवडणुका या अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने पार पाडल्या जातात.


 आपल्या लोकशाहीला अजून बळकटी आणण्यासाठी प्रत्येक अठरा वर्षाच्या वरील नागरिकांनी मतदान करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

 निवडणूक प्रक्रिया म्हणजे भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवांमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा.


 आपल्याला आवडत असलेल्या कुठल्याही उमेदवाराला आपण मतदान करावे.


 मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

 सुट्टी आहे म्हणून आपण बाहेर कुठेही न जाता स्वतः मतदानाच्या दिवशी हजर राहून मतदान करायचे आहे.

 माझ्या एका मताने काय होणार आहे असे न गृहीत धरता एका मताची किंमत ही लोकशाहीमध्ये अमूल्य आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये एक मत अत्यंत आवश्यक असल्यामुळे आपण मतदान करावे.

 मतदान करणे हे आपल्या देशासाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.


 आपण स्वतःही मतदान करावे आणि इतरांनाही मतदान करा म्हणून जण जागृती करावी.

Post a Comment

0 Comments