आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम.मानद अध्यक्ष म्हणून धर्यशील भोसलेच.

 आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम.मानद अध्यक्ष म्हणून धर्यशील भोसलेच.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

-----------------------------------

आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टच्या जुन्या विश्वस्थांना कायम ठेवून जुन्या विश्वस्थांना कायम केल्याचा मा.धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांचा निर्णय कायम कऱण्यात आला. देशभरातल्या अखंड सद्गगुरू बाळूमामा भक्तांना मोठा दिलासा दिला असल्याचा़ी प्रतिक्रिया अनेक जाणकार भक्तांनी दिली. .गेले दिड दोन वर्ष झालेल्या या लढ्याला अखेर सद्गुरू बाळूमामांच्या कृपेने योग्य तो न्याय मिळाल्याची भावना भक्तातून बोलली जात आहे.

      देवस्थान विश्वातली मोठी लढाई अखंड देेशाने या निमित्ताने अनुभवली. आरोप प्रत्यारोप झाले. मोठ्या न्यायालयीन लढाया झाल्या.सद्गगुरू बाळूमामा देवालय ट्रष्ट हा सन २००३ ला धर्मादाय आयुक्त कडे नोंद करण्यात आला. त्यावेळी मामांच्या संबंधित घराण्यांच्या वंशजाना विश्वस्थ म्हणून घेवून १९ जनांचा हा ट्रष्ट स्थापन करण्यात आला.मानद अध्यक्ष म्हणून धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष म्हणून रामभाऊ मगदूम तर सचिव म्हणून रावसाहेब कोणेकरी यांची नियुक्ती करण्यात आली.यातील आतापर्यंत १९ पैकी ६ विश्वस्थ मयत झाले आहेत तर एका विश्वस्थाने राजीनामा दिला आहे.

    या देवस्थानचा कारभार वाढत गेला तशा त्रुटीही वाढत आल्या.यातून तक्रारींना सुरूवात झाली. सरपंच व पोलीस पाटील यांनी कायमपणे ट्रष्ट ला सहकार्य केले आणि पूढे याच ट्रष्ट च्या गैरकारभाराबाबत प्रविण पाटील ,रविंद्र पाटील, हणमंत पाटील या तिघांनी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम व सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्याविरुध्द धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली.या तक्रारीत प्रतिवादी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम व सचिव कोणकेरी यांच्या बाजूने उभे राहीले तेही चौकशीच्या जाळ्यात अडकले.यातील निरिक्षक अहवालाच्या शिफारशीनुसार २४ एप्रील २०२३ ला ट्रस्ट बरखास्त करण्यात आला. त्यानंतरच्या साऱ्या तक्रारीवरून शिवराज नाईकवडी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक नेमले.ते गेले वर्षभर कार्यरत होते.उच्च न्यायालयाने ३० एप्रील २०२४ च्या आत नविन विश्वस्थ मंडळ नियुक्तीचा आदेश दिला होता.त्यास अनुसरून या विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली. आताच्या या विश्वस्थ मंडळात सरपंच पद व जुन्या विश्वस्थ मंडळातील नऊ जन घेण्यात आले आहेत.पोलीस पाटील हे शेजारच्या मुदाळ गावचे असल्याने त्यांची भुमिका तटस्थ आहे.मुळ घटनेप्रमाणे धैर्यशील भोसले यांना मानद अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.जुन्या परंतू आता नव्या या विश्वस्थ मंडळाशी धैर्यशील भोसले यांना जमवून घ्यावे लागणार आहे.

   १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ट्रष्ट चे कार्याध्यक्ष मगदूम यांचे निधन झाले त्यानंतर मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी गावातील ५ सदस्यांना विश्वस्थ म्हणून नेमले व बनवलेल्या प्रोसिडिंगनुसार ते कार्याध्यक्ष झाले.या मिटिंगसाठी आवश्यक तो कोरम पुर्ण झाला नव्हता त्यामूळे या सभेस अनुपस्थीत असलेल्या सदस्यांनी ही तक्रार दाखल केली व या १० विश्वस्थ सदस्यांनी एकत्र येवून पुंडलिक होसमनी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली.यात वाद वाढत गेला.या आताच्या नव्या आदेशात गावातील हे ५ विश्वस्थ सदस्य पद रद्द झाले.सध्या ११ जनांचे हे विश्वस्थ मंडळ न्यायालयीन आदेशाने कार्यरत झाले आहे.

   हा सारा प्रपंच सद्गुरू बाळूमामांचा आहे.ही सारी मामांचीच कृपा आहे.मामांची कारभारावर नजर आहे.तिन्ही विश्वाचे मालक असलेले मामा आपल्याच देवस्थानात गैरकारभार कसा काय सहन करणार.आंम्ही सारे निमित्यमात्र आहोत.हे साऱ्यांनी ओळखून घ्यावे व येणाऱ्या काळात चोख कारभार ठेवावा अशी प्रतिक्रिया सरपंच विजयराव गुरव यांनी या संबंधाने दिली आहे.कार्याध्यक्ष पद आता नामधारी राहाणार नाही ते फिरत राहील मात्र कारभार स्वच्छ व पारदर्शी होईल असा विश्वास विश्वस्थ व सरपंच गुरव यांनी दिला.येणाऱ्या काळात पंढरपूर, शिर्डी, शेगावं च्या धर्तीवर आदमापूर चा विकास करू यासाठी विशेष निधी मिळवून घेवू असेही सरपंच विजयराव गुरव म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.