पद्मावती ट्रस्टचे उपक्रम समाजाला दिशादर्शक विलासबाबा जवळ.
पद्मावती ट्रस्टचे उपक्रम समाजाला दिशादर्शक विलासबाबा जवळ.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
-------------------------------
मेढा :- जावली तालुक्याच्या दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून गरीब व गरजू विद्यार्थ्यां बरोबरच सर्वच विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी शिक्षकांकडून समजून घेवून सहकार्य हात करणारे चोरांबे येथिल पद्मावती चॅरीटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असून समाजाला दिशादर्शक असल्याचे गौरवोदगार जि.प.शाळा जवळवाडी येथिल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना व्यसनमुक्त संघाचे मा.अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी काढले.
आदर्श गाव चोरांबे येथिल रोजगारासाठी गेलेल्या मुंबईस्थित युवकांनी एकत्र येवून पद्मावती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून पूरग्रस्थांना मदत,कुसुंबी यात्रेमध्ये मोफत पाणी वाटप,
गावातील ओढ्यांवरती वनराई बंधारे बांधणे,वणवा बंदीसाठी डोंगरामध्ये जाळ पट्टा काढणे या बरोबर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे असे विविध उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून राबविले जात आहेत.
जि.प.शाळा जवळवाडी येथिल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चोरांबे गावचे सरपंच विजय सपकाळ,मा.सरपंच भिवराम सपकाळ,पोलीस पाटील तुषार सपकाळ,अंकुश सपकाळ गुरुजी,भगवान सपकाळ,समाजसेवक मोहन सपकाळ,दत्ता सपकाळ, ग्रामपंचायत कर्मचारी जगताप जवळवाडीचे उपसरपंच शंकरराव जवळ,अध्यक्ष सागर जवळ, प्रकाश जवळ, खाशाबा चोरगे,सचिन जवळ, विशाल चव्हाण इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंकुश सपकाळ गुरूजी, सरपंच विजय सपकाळ यांनी ट्रस्टचे उपक्रम विषद करून कर्तव्य भावनेतूनच आम्ही शालेय साहित्याचे वाटप करीत असल्याचे सांगितले. विलासबाबा जवळ यांनी ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक करून समाजात होणारे वाढदिवस व मोठमोठ्या समारंभात होणार्या खर्चांना फाटा देवून शाळेतील गरीब व गरजूंना मदतीचा हात दिल्यास देशाची वैभवशाली पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल अशा भावना व्यक्त करून ट्रस्टचे उपक्रम समाजाला दिशादर्शक व अनुकरनिय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापिका अनिता जाधव यांनी केले तर आभार विशाल चव्हाण यांनी मानले.
Comments
Post a Comment