महिला अन्न सुरक्षा अधिकारी 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत पथकाच्या ताब्यात.
महिला अन्न सुरक्षा अधिकारी 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत पथकाच्या ताब्यात.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------
कोल्हापूर - रेस्टॉरंट वर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याकडून २५,०००/-रू.लाच रक्कम स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. श्रीमती किर्ती धनाजी देशमुख.( रा. विश्व रेसीडेन्सी,फ्लॅट नं.२०२,ताराबाई पार्क कोल्हापूर, मूळ पत्ता रा. समर्थनगर, मोहोळ, ता.जि. सोलापूर.) असं त्यांचं नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे किणी, ता. हातकणंगले इथं मे.सम्राट फुडस नावाचे रेस्टॉरंट आहे. दि.१५ मार्च २०२४ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांच्या रेस्टॉरंट वर तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले होते. देशमुख यांनी रेस्टॉरंट कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याक्डून १,००,०००/-रू.ची मागणी करून तडजोडीअंती ७०,०००/- रुपये लाच द्यायचं ठरलं. त्यापैकी २५,०००/-रू. लाचेचा पहीला हफ्ता आज राहत्या घराच्या पार्किंगमध्ये स्वतः स्विकारताना देशमुख यांना रंगेहात पकडण्यात आले.
Comments
Post a Comment