Posts

Showing posts from April, 2024

चैतन्य प्रभू शिक्षण प्रसारक मंडळ जाधववाडी कोल्हापूर.

Image
  चैतन्य प्रभू शिक्षण प्रसारक मंडळ जाधववाडी कोल्हापूर. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  हातकणंगले प्रतिनिधी दत्तात्रय कोळेकर -----------------------------------  सौ सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल स्कूल मार्केट यार्ड कोल्हापूर. ======================== 🏵️ *NMMS परीक्षा 2023-24 निकाल*🏵️   🎖️🎖️ *NMMS राष्ट्रीय शिष्यवृतीस पात्र विद्यार्थी - 1*🎖️🎖️ ======================== *1) कु. गांगुर्डे श्रावणी पांडुरंग* 🏆 ======================== *NMMS राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12000/- रुपये प्रमाणे 9 वी ते 12 वी अखेर 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे .* ____________________________ * तसेच विद्यालयातील खालील 03 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड..( इयत्ता 9 वी ते 12 वी अखेर प्रत्येक वर्षी 9600 रु , याप्रमाणे रु 38400/- इतकी शिष्यवृत्ती प्रति विद्यार्थी मिळणार..)* *( प्रति विद्यार्थी 38400 रु प्रमाणे 1,15,200 रुपये इतकी शिष्यवृत्ती विद्यालयाच्या माध्यमातून खालील 3विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणा

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारकाची आत्महत्या

Image
  राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारकाची आत्महत्या. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------------- कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारक अमर विलास आयरे वय वर्ष 54 यांनी दवाखान्यातील राहत्या कॉटर्समध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपले. आज सकाळी ही घटना उघड झाली याबाबत घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, परिचारक अमर आयरे मुळगाव जुना बुधवार पेठ, कोल्हापूर हे गेले मागील बारा ते पंधरा वर्षे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून सेवेत आहेत.मागील दहा वर्षापासून ते दवाखान्यातील कॉटर्समध्ये पत्नी व मुलासह राहत आहेत. आज सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला नायलॉनची रस्सी बांधून जीवन संपवले. या घटनेमागचे नेमके कारण समजलेले नाही. याबाबतची फिर्याद आयरे यांचे मेहुणे गजानन कृष्णा भोई राहणार गारगोटी यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. याबाबत राधानगरी पोलीस अधिक तपास करित आहेत .

आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम.मानद अध्यक्ष म्हणून धर्यशील भोसलेच.

Image
  आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम.मानद अध्यक्ष म्हणून धर्यशील भोसलेच. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे  ----------------------------------- आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टच्या जुन्या विश्वस्थांना कायम ठेवून जुन्या विश्वस्थांना कायम केल्याचा मा.धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांचा निर्णय कायम कऱण्यात आला. देशभरातल्या अखंड सद्गगुरू बाळूमामा भक्तांना मोठा दिलासा दिला असल्याचा़ी प्रतिक्रिया अनेक जाणकार भक्तांनी दिली. .गेले दिड दोन वर्ष झालेल्या या लढ्याला अखेर सद्गुरू बाळूमामांच्या कृपेने योग्य तो न्याय मिळाल्याची भावना भक्तातून बोलली जात आहे.       देवस्थान विश्वातली मोठी लढाई अखंड देेशाने या निमित्ताने अनुभवली. आरोप प्रत्यारोप झाले. मोठ्या न्यायालयीन लढाया झाल्या.सद्गगुरू बाळूमामा देवालय ट्रष्ट हा सन २००३ ला धर्मादाय आयुक्त कडे नोंद करण्यात आला. त्यावेळी मामांच्या संबंधित घराण्यांच्या वंशजाना विश्वस्थ म्हणून घेवून १९ जनांचा हा ट्रष्ट स्थापन करण्यात आला.मानद अध्यक्ष म्हणून धैर्यशील भोस

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज वाटपास सुरुवातवाढीव कर्ज नाही,

Image
  जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज वाटपास सुरुवातवाढीव कर्ज नाही, ---------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर  ---------------------------------------- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून सेवा सहकारी सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली आहे परंतु यावर्षी मात्र जेवढा भरणा केला तेवढेच कर्ज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे .         पीक कर्ज वाटपाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सेवा सहकारी सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्या जाते 31 मार्च पूर्वी पीक कर्जाचा भरणा केलेल्या नियमित खातेदार शेतकऱ्यांना 29 एप्रिल रोजी पीक कर्ज वाटप करण्यात आले एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये प्रमाणे पीक कर्ज वाटप करण्यात आले नियमित खातेदार शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा केला होता तेवढेच पीक कर्ज मिळाले आहे इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अल्प प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात येते यावर्षी मात्र पीक कर्जामध्य

रखरखत्या उन्हात पाण्यावाचून जनावरांची त्राही-त्राही,त्यांच्यासाठी सुविधा व्हावी.

Image
  रखरखत्या उन्हात पाण्यावाचून जनावरांची त्राही-त्राही,त्यांच्यासाठी सुविधा व्हावी. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर -------------------------------------  :-जल ही जीवन हैl जल है तो जहाँ है l पाणी आहे तरच सजीव सृष्टी आहे. ही अशी अनेक सुभाशीत आपण शालेय पुस्तकातून नेहमीच वाचत असतो किंवा विविध कार्यक्रमातून ऐकत असतो.पाणी हे माणसासह सर्व सजीवांना अवश्यक आहे. माणसाला पिण्याच्या पाण्याची सुविधा नळाद्वारे अगदी घरापर्यंत नव्हे घरातील प्रत्येक खोली खोली पर्यंत आली आहे. प्रवासात असाल तर कुठेही पाणी सहज उपलब्ध होते अर्थात पैसे देऊनच. किंवा माणसांवर दया दाखविणारे खूप दानशूर व्यक्तिमत्व कोणाच्या तरी स्मुर्ती प्रित्यर्थ किंवा सौजण्याने पानपोई सुरु करतात आणि पुण्य कमावतात आणि त्यांच्या या सत्कार्याबद्दल त्यांना पुण्य मिळालही पाहिजे. परंतु माणसाएवढीच सर्वच मुक्या जनावरानाही रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे परंतु मुक्या जनावरांना माणसासारखं पाणी मागून उपलब्ध करता येत नाही किंवा विकतही घेता येत नाही ते निसर्गता उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता मधील मतदान जनजागृतीचे विचार आजही आदर्शवत ः जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता मधील मतदान जनजागृतीचे विचार आजही आदर्शवत ः जिल्हाधिकारी अमोल येडगे. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापुर जिल्हा परिषद  शशिकांत कुंभार  --------------------------------- कोल्हापूर - सजग नागरिक म्हणून जबाबदारीने सामाजिक जीवनात कार्य करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचार हे नेहमीच सर्वांना आदर्शवत आहेत. त्या मधीलच मतदारांना इशारा म्हणून एक एक मत लाखमोलाचे - मत हे दुधारी तलवार, त्याची लावावी कसोटी सुंदर - सावधपणे ' हे व्यक्त केलेले विचार आजही सर्वत्र तंतोतंत लागू पडतात. त्याचा प्रसार व्यापकतेने व्हावा यासाठी हा दैनिक सिंधुदुर्ग समाचार व 90.4 मँगो एफ एम परिवाराचा उपक्रम नक्कीच सर्वत्र अनुकरणीय आहे अशा उपक्रमांना जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने नेहमीच सहकार्य केले जाईल असे सांगत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या कार्यक्रमासाठीआपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.     जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग समाचारच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मतदारांना इशारा या मतदान जनजागृती विश

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींच्या स्वागतासाठी लोटली अख्खी बनाचीवाडी : शाहू छत्रपतींच्या विजयासाठी ग्रामस्थांची एकीची वज्रमूठ

Image
  युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींच्या स्वागतासाठी लोटली अख्खी बनाचीवाडी : शाहू छत्रपतींच्या विजयासाठी ग्रामस्थांची एकीची वज्रमूठ  ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी  प्रतिनिधी  विजय बकरे बनाचीवाडी (ता. राधानगरी) हे  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांसद आदर्श ग्राम दत्तक योजनेतून घेतलेले राधानगरीच्या कुशीत वसलेले गाव. या गावानेशाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त गावी आलेल्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींचे जंगी स्वागत केले. स्वागतासाठी अख्खा गाव लोटला होता. या निवडणुकीत संपूर्ण गाव शाहू छत्रपती महाराजांच्या पाठीशी ठामपणे आहे हे एकीच्या वज्रमुठीतून दाखवून दिले.  शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारासाठी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावे नि गावे पिंजून काढत आहेत. राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथे भेटीदरम्यान दारातील सडारांगोळी, रस्त्याच्या दुतर्फा डोक्यावर कळस घेऊन उभ्या असलेल्या सुवासिनी, मुलींचा मर्दानी खेळ, घोडा नाचविणे, लेझीम खेळाने चैतन्यदायी वातावरण बनले होते. ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने स्वागत केले ते लक्षवेध

भारतीय जनता पक्षाचा पराभव करा प्रा - नितीन बानूगडे पाटील.

Image
  भारतीय जनता पक्षाचा पराभव करा प्रा - नितीन बानूगडे पाटील. -------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी  अमित खांडेकर  ----------------------------   उद्योग गुजरातला पळून महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारतीय जनता पक्ष व महायुतीचा पराभव करा. असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले. ते पुलाची शिरोलीत महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर माजी सरपंच शशिकांत खवरे, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य अनिल खवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले 20 24 ची लोकसभा निवडणुक ही नेत्यांची निवडणूक नसून लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मतदाराने आपल्या भारताचा नागरिक हा सुसंस्कृत बनवायचा आहे की गुलाम बनवायचा आहे याचा फैसला करण्याची आवश्यकता आहे.भारतीय जनता पक्ष हा भांडवलदारांचा पक्ष आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता तर देशा

ट्रेलर चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.

Image
  ट्रेलर चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू. --------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी  अमित खांडेकर --------------------------------------- सोमवारी रात्री गोकाक,कर्नाटक येथून एक्स्पोर्ट चे मटेरियल घेऊन नितीन ट्रान्सपोर्ट कंपनीचा,जे एन पी टी एम येथील एच ४३ बी जी १६२१  या नंबर चा ट्रेलर घेऊन ट्रेलर चालक मोहमद वसीक हा जे एन पी टी, न्हावाशीवा,नवी मुंबईकडे निघाला होता. आज सोमवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 8 च्या सुमारास शिरोली एम आय डी सी येथील एच एम टी फाटा येथे मारुती सुझुकी शोरूम जवळ हा ट्रेलर आला असता अचानक छातीत जोरदार कळ येऊन या ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.  हा चालक मूळचा उत्तरप्रदेश येथील संत कबीर नगर येथील  आहे.अशा मृत्यूसमयी सुद्धा या चालकाने प्रसंगावधान राखून ट्रेलर बाजूला घेऊन हँड ब्रेक दाबला.सकाळ च्या दरम्यान एम आय डी सी कामावर येणाऱ्या लोकांची गर्दी असते, चालकाने ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला.अचानक जागेवर जोरात ब्रेक दाबल्याने मोठा आवाज आला.आवाज ऐकून स्थानिक लोकांनी गाडीकडे धाव घेतली. चालकाला खाली घेऊन  गाडी  रस्त्यावरून बाज

मिरज एमआयडीसी मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल..

Image
  मिरज एमआयडीसी मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल.. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम -------------------------------------- मिरज शहरातील ईदगानगर पासून शंभर फुटी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या बेथेस्तदा विद्यालयाच्या समोर असणाऱ्या दुर्गंडे गोडद इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागली आज मंगळवार सकाळी नऊच्या सुमारास वीज प्रवाह सुरू असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधून शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी भंगार गोडाऊन मधील कचऱ्यात पडली चऱ्याच्या ढेकार्‍यातून रागिनी जोर कडला या आगीचे लोन इतके पसरले की मिरज एमआयडीसी परिसरात ने काही परिसर व्यापला होता या ठिकाणी अग्निशमन च्या गाड्या दाखल झाल्या आग विझवण्याचे आटोकात प्रयत्न सुरू आहे   घटनास्थळी बघणाऱ्यांचे खूप गर्दी झाले आहे

वाठार बु.ता खंडाळा येथे छापा टाकून लोणंद पोलिसांनी केला ४९९५२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त.

Image
वाठार बु.ता खंडाळा येथे छापा टाकून लोणंद पोलिसांनी केला ४९९५२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त. ----------------------------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र  लोणंद प्रतिनिधी  वैभव शिंदे ------------------------------------------------------  वाठार बु. ता. खंडाळा येथे लोणंद पोलीसांनी केली गुटख्याची कारवाई.        याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २७/४/२०२४ रोजी संध्याकाळी ७.३६ वाजण्याचे सुमारास लोणंद पोलीस ठाणे अधिकारी श्री सुशिल बी. भोसले, व त्यांचे सहकारी पोलीस ठाणेकडील शासकिय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बी. भोसले यांना बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा याने त्याचे घराचे शेजारी असलेल्या शेडमध्ये अवैदय रित्या गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे त्या बातमीचे आधारे विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यांचे घराचे पश्चिम बाजुस असले पत्राचे शेडमध्ये अचानक रात्री ९.१५ वाजता छापा टाकला तेथे विशाल चंद्रकांत गाढवे वय ४१ रा. वाठार बु. ता. खंडाळा हा मिळुन आला. सदर शेडची झडती घेतली असता शेडमध्ये कुरकुरे

तिरंगी लढतीत बाळासाहेब आंबेडकरांचे पारडे जड.... सय्यद अकील वंचित ता. अध्यक्ष.

Image
  तिरंगी लढतीत बाळासाहेब आंबेडकरांचे पारडे जड.... सय्यद अकील वंचित ता. अध्यक्ष. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजित ठाकूर  ------------------------------- -वंचित बहुजन आघाडी अकोला लोकसभा मतदार संघात आघाडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच भावी खासदार होतील असा दुर्दैम्य आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांनी दैनिक महासागर च्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत 2019 च्या निवडणुकीत सुद्धा सय्यद अकील यांनी कामं केलं.2019 आणि 2024 या दोन निवडणुकीत प्रचंड बदल झाला असून झालेला बदल हा बाळासाहेबांसाठी अतिशय पूरक ठरला आहे. महाविकास आघाडी सोबत जाण्याची बोलणी फिस्कटली आणि बाळासाहेबांनी स्वतंत्र लढण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तिरंगी लढत होऊन बाळासाहेबांचा विजयाचा मार्ग सुकर होणार.  अकोला लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीचे मतदान 2019 च्या तुलनेत वाढले आहे.मागच्या पेक्षा बाळासाहेबांना दोन लाख मते अधिक मिळतील असा अभ्यासपूर्ण तर्क सय्य

पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर.

Image
  पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड  प्रतिनिधी  रणजीत ठाकूर. ------------------------------ प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवी श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.  श्री उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय येथे शनिवार व रविवार दिनांक 4 व 5 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन मुंबई अंतर्गत संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, मुंबई, समता सर्वस्व कॅन्सर सेंटर, आरोग्य विभाग वाशीम, हिंगोली व बुलढाणा तसेच डॉक्टर असोसिएशन रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून या शिबिरामध्ये प्रामुख्याने  सर्व प्रकारचे कर्करोग म्हणजेच कॅन्सर, गुडघ्यांचे व खुब्याचे प्रत्यारोपण म्हणजेच नी व हीप जॉईंट रिप्लेसमेंट, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातील.      सर्व प्रकारचे कॅन्सर मध्ये जसे की, स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर, यां

महाविद्यालय युवतींची आत्महत्या.

Image
महाविद्यालय युवतींची आत्महत्या.  महाविद्यालयीन युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली . कोथळी ता. करवीर. जिल्हा .कोल्हापूर  येथील महाविद्यालयीन यूवती  कु. सानिका संभाजी कूंभार (वय  22) हिने आज सकाळी घरच्या किचन रूममध्ये दोरीने  गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही  या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून आधीक तपास.  करवीर पोलीस करत आहेत . 🌹🌹

बच्चू कडू चा महायुतीवर प्रहार हातकणंगले मध्ये करणार राजू शेट्टींचा प्रचार.

Image
  बच्चू कडू चा महायुतीवर प्रहार हातकणंगले मध्ये करणार राजू शेट्टींचा प्रचार. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम --------------------------------- बच्चू कडू यांनी अमरावती महायुतीच्या विरोधात भूमिका घेत प्रहार पक्षाकडून दिनेश बुक यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता बच्चू कडू हे पुन्हा एकदा महायुतीविरोधात दंड थोपटण्याचा तयारीत आहेत ते आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ माहितीच्या उमेदवार विरोधात राजू शेट्टी यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भ एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी माहिती दिले बच्चू कडू म्हणाले राजू शेट्टी हे चळवळीतील नेते आहेत ते शेतकऱ्यांसाठी लढणारे एक योद्धा आहे ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो त्याचप्रमाणे राजू शेट्टी काम करतात मला माहिती आहे की हातकणंगले मध्ये दोन्ही मराठा समाजाचे नेते उभे आहेत मात्र जातीच्या पलीकडे जाऊन आमचं नातं शेतकऱ्यांशी जोडले गेले आहे ते नातं आम्ही टिकू आणि राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मी हातकणंगलेमध्ये प्रचार करण्यासाठी

केशवनगर परिसरात अवकाळीने शेतकऱ्याचे कांदा पिकाचे नुकसान.

Image
  केशवनगर परिसरात अवकाळीने शेतकऱ्याचे कांदा पिकाचे नुकसान. आंब्याचे झाड ही कोसळले रणजीत ठाकूर रिसोड प्रतिनिधी रिसोड तालुक्यातील ग्राम केशवनगर येथील शेतकरी रमेश महादू सरोदे व सुरेश महादु सरदे यांच्या शेतातील केशवनगर परिसरातील गट नंबर 38 मधील शेतातील कांदा पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे ,सविस्तर वृत्त असे की काल रात्री रात्री दोन वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस हवेमुळे व वादळी वाऱ्यामुळे सुरेश महादेव सरोदे व रमेश महादू सरोदे यांच्या शेतातील केशवनगर परिसरातील गट नंबर 38 मधील बियाचा कांदा पूर्णपणे उखडून पडला व हवेमुळे कांद्याचे गेंद खाली वाकल्यामुळे ते व पावसामुळे भिजल्या पावसाने त्याची नको ती हेळसांड झाली ,त्यामुळे कांद्याचे पीक होत्याचे नव्हते झाले ,यावेळी सदर शेतकऱ्याने गेल्या तीन-चार महिन्यापासून घेतलेल्या मेहनतीवर अखेर पाणी करणार काय असा भावनिक सवाल शेतकरी सुरेश महादेव सरोदे व रमेश महादेव सरोदे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला तसेच शेतातील आंबा सुद्धा मोडून पडल्यामुळे पिकण्याआधीच आंबा सुद्धा शेतकऱ्यांना खायला मिळणार नाही सदर बाबीची

अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मागणीत घट, दरातही घसरण, विक्री निम्म्यावर.

Image
 अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मागणीत घट, दरातही घसरण, विक्री निम्म्यावर.. ---------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर  ----------------------------------  रिसोड तालुक्यात एप्रिल महिन्यात मागील काही दिवसापासून सातत्याने तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दरात सुद्धा घसरण झाली असून विक्री देखील निम्म्यावर आली असल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली.मागील काही दिवसांपूर्वी लहान थोरांपासून सर्वांना उन्हाळ्यात अगदी हवाहवासा वाटणारा फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला त्यामुळे प्रारंभी आंब्याचे दर प्रति किलो शंभरी पार होते परंतु त्यानंतर मात्र अवकाळीचे सावट आले आणि आंब्याचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलो वर येऊन पोहोचले. मागील आठवडाभर अवकाळी ढग असल्याने आंब्यांना फारशी मागणी नाही. दशहरी ,केशर, बदाम, , नंगडा व लालबाग अशा विविध जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले असून ग्राहकांना पूर्वी दशहरीसाठी प्रति किलो १०० , केशर साठी १३०, बदाम साठी १००, सटकुलस साठी ८०, नंगडा साठी १०० व लाल

कंथेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरुवात.

Image
  कंथेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरुवात. -------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे -------------------------------------- राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी, येथील ग्रामदैवत श्री चिंचामाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळास आज रविवारपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संयोजक प्राध्यापक बी के पाटील यांनी सांगितले या सोहळ्यामध्ये काकड आरती ज्ञानेश्वर पारायण हरिपाठ प्रवचन तसेच ह भ प तुकाराम पाटील ह भ प भीमराव चौगुले ह भ प नामदेव पाटील ह भ प हरिप्रसाद सोनवणे ह भ प मारुती दुर्गुळे ह भ प युवराज वा ग रे यांचे व ह भ प आनंदा मोहिते ह भ प पांडुरंग बामणीकर ह भ प आनंदा खाडे ह भ प गुरुनाथ सुतार ह भ प प्रकाश अलगदार यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आजपासून आयोजित केला असून दिनांक 4 मे रोजी अवधूत चिंतन सोंगी भजन सोन्याची शिरोली यांचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक पाच मे रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद दिंडी सोहळ्या चा सप्ताहाचा सांगता समारंभ होणार असल्याचे प्राध्यापक बीके पाटील यांनी सांगितले

घरावर वीज कोसळून चार लाखाचे नुकसान.भोकरखेड येथील घटना.

Image
  घरावर वीज कोसळून चार लाखाचे नुकसान.भोकरखेड येथील  घटना. ----------------------------  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर  ----------------------------  तालुक्यातील भोकरखेड येथील शेतकरी विष्णू दगडूजी लांडगे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून इलेक्ट्रिक साहित्य व घराची वरील पॅराफीट  वॉल पडल्या मुळे अंदाजे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याची घटना 27 एप्रिलच्या रात्री घडली.          मागील एक ते दीड महिन्यापासून घर उन्हाळ्यातही वादळी वारा अवकाळी पाऊस  काही पिच्छा सोडेना दिवसा पारा चाळीसच्या वर जातो तर रात्रीला अचानक वादळी वारा व पाऊस होत आहे अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा व विजेच्या गडगडासह पावसाला सुरुवात होत आहे काल दिनांक 27 एप्रिलच्या रात्री वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा व विजेच्या तालुक्यात पाऊस झाला यावेळी भोकरखेड येथील शेतकरी विष्णू दगडू जी लांडगे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली यामध्ये टीव्ही पंखे फ्रिज यास इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले तसेच मागील एक वर्षांपूर्वी बांधलेल्या पक्क्या स्लॅबच्या घरावरील पॅरापिट वॉल कोसळली घराच्या भिंतीलाही तडे गेले असल्

छ.संभाजीनगर येथे "एक मुठ धान्य पक्ष्यांसाठी" कार्यक्रमाचे आयोजन

Image
  छ.संभाजीनगर येथे "एक मुठ धान्य पक्ष्यांसाठी" कार्यक्रमाचे आयोजन. -----------------------------  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत.ठाकूर -----------------------------  छ.संभाजीनगर.  ग्रहांची उत्पत्ति व त्यांचे आस्तित्व या संदर्भात आतापर्यंतच्या झालेल्या संशोधनानुसार असा निष्कर्ष काढण्यात आला की,ब्रम्हांडामध्ये सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी होय. जेव्हा-केव्हा सजिव सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा जन्मजात प्रत्येक सजीवाला त्याच्या आस्तित्वानुसार जगण्याचा अधिकार निसर्गाकडून प्रदान करण्यात आला. पण मानवाच्या स्वार्थी व अति प्रगल्भ बुध्दीमत्तेमुळे व हव्या तश्या सुख- सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या हव्यासा पोटी वृक्ष व पशु- पक्ष्यांच्या अनेक प्रजाती लुप्त झाल्या,ह्यात तिळमात्र शंका नाही.आणि यापुढे असेच मानवी धोरण कायम राहिल्यास मानवाचे अस्तित्व सुद्धा संपुष्ठात येईल हि काळ्या दगडावरील रेघ आहे.असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी छ.संभाजीनगर स्थित नक्षत्रवाडी येथे सौ.पुष्पा सुरेश मुंगसे यांच्या राहत्या घरी "एक मुठ ध

इलेक्ट्रिकल्स सेल्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन व संजीवनी ब्लड बँक वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

Image
  इलेक्ट्रिकल्स सेल्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन व संजीवनी ब्लड बँक वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. --------------------------------  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार  --------------------------------   सेल्स एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन व संजीवनी ब्लड बँक शांतिनिकेतन हायस्कूल जवळील तर्फे यंदा हे तिसरे वर्ष आहे रक्तदान शिबिराचे यामध्ये यावेळी ८० रक्त दात्यांनी रक्तदान केले. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिकल फिल्डमधील एम्प्लॉईज यांची उपस्थिती उल्लेखनीय तसेच दुकानदार यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. संघटनेचे हे पाच वर्ष यापूर्वीही या संघटनांद्वारे कोविड काळात महानगरपालिकेला शिनिदान उपक्रमा असो, वृद्धाश्रमास भेटवस्तू, अनाथ आश्रम मधील मुलांना मदत असो असे विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये उपक्रम राबवले जातात. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष निखिल पवार, संदीप पोवार , सतीश चौगुले, स्वप्निल चौगुले, अनिकेत भोसले, सुजित साळुंके ,इंद्रजीत साळुंखे, विवेक चौगुले सचिन पवार. सभासद वर्ग व संजीवनी ब्लड बँकेचे सर्व कर्म

लग्नमुहूर्त कमी मतदान होण्याचे एक कारण?

Image
  लग्नमुहूर्त कमी मतदान होण्याचे एक कारण? ------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजित ठाकूर  ------------------------------------- नवरदेव मतदानाला आणि वऱ्हाडी लग्नाला.  रिसोड(लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल शुक्रवारी पार पडले.मतदानाची प्रत्येक लोकसभा मतदार संघातील टक्केवारी अपेक्षेपेक्षा फार कमी राहली. प्रशासकीय स्तरावरून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. मतदारांची उदासीनता, चुकीच्या राजकीय वातावरणाची आलेली चीड यामुळे मतदार आपला अधिकार वापराण्यासाठी बाहेर निघालाच नाही तर गावाखेड्यातील रोजगारासाठी स्थलांतरित मतदार सुद्धा आले नाही ही सर्व कारणे मतदान कमी होण्याची  कारणे वाटत असली तरी 26 एप्रिलच्या दिवशी लग्न मुहूर्त असल्यामुळे प्रत्येक गावात लग्न समारंभ होते किंवा नात्यागोत्यातील लग्नाला जाणारा वर्ग फार मोठा होता. मतदानाला गेलं तर उशीर लागेल आणि लग्नाला जाणाऱ्या गाड्या निघून जातील म्हणून अनेक गावामध्ये मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली ही वास्तविकता आहे. अनेक नवरी नवरदेवानी लग्नाला जाण्यापूर्वी मतदान केले

निधन वार्ता.

Image
  निधन वार्ता. अमर गुंडा वायदंडे वय ( ४५ ) रा. शाहूनगर वायदंडे वसाहत गडमुडशिंगी ता. करवीर यांचे दिनांक २८ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे ते गडमुडशिंगी चे माजी उपसरपंच गुंडा वायदंडे यांचे चिरंजीव आहेत.रक्षाविसर्जन मंगळवारी ३० रोजी गडमुडशिंगी येथे आहे.

रिसोड-मालेगाव विधानसभा क्षेत्रात मालेगाव तालुक्यात आंबेडकरांना तर रिसोड तालुक्यात धोत्रेना आघाडी?

Image
रिसोड-मालेगाव विधानसभा क्षेत्रात मालेगाव तालुक्यात आंबेडकरांना तर रिसोड तालुक्यात धोत्रेना आघाडी? ----------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजितसिंह ठाकुर ----------------------------------- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिलला मतदान पार पडले. अकोला लोकसभा मतदार संघात अकोला जिल्ह्याबाहेरील वाशीम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव हा विधानसभा मतदार संघ येतो.या विधानसभा मतदार संघाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अकोला जिल्ह्यातील मतदार संघापेक्षा थोडी विसंगत आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत राहतात. येथील मतदार पक्षनिष्ठा पेक्षा व्यक्तींनीष्ठा जोपसतात त्यामुळे मतदार कधीच कोण्या एका पक्षाच्या बाजूने आहे असे सांगता येत नाही.  आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तिघांपैकी कोण निवडून येईल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे परंतु निवडून येणाऱ्याचे मताधिक्य फार कमी म्हणजे पंचवीस तीस हजारापे

वळीवडेचे तलाठी तडकाफडकी निलंबित, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष.

Image
  वळीवडेचे तलाठी तडकाफडकी निलंबित, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष. ------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  कोल्हापुर जिल्हा प्रतीनिधी  शशिकांत कुंभार  ------------------------------------- निवडणूक कामात अनुपस्थित राहिला म्हणून करवीर तहसील मधील वळीवडे येथील तलाठी प्रवीण शेजवळ यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी पसरले आहे. निलंबन कारवाईच्या या टोकाच्या कृतीने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा निर्णय कोणालाही पटला नसल्याचे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी करवीर उपविभाग यांनी निलंबित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, आपणास मतदान यंत्र तयार करणे कामी आदेशित करण्यात आले होते. सदर आदेशान्वये आपण नेमून दिलेले कामकाज पूर्ण होईपर्यंत हजर राहणे आवश्यक होते, तथापि आपण सदर कामकाजाच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार हरेश धार्मिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 47-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 274 कोल्हापूर दक्षिण विभाग मतदार संघ तथा उपविभागीय अध

साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज - मधुरिमाराजे छत्रपती,राधानगरी संपर्क दौरा.

Image
  साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज - मधुरिमाराजे छत्रपती,राधानगरी संपर्क दौरा. ---------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------  श्रीमंत शाहू महाराजांनी समाजासाठी कामे केली पण त्या कामांची कधी जाहिरात केली नाही साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज असल्याचं प्रतिपादन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केलं त्या राधानगरी इथं महिला संपर्क मेळाव्यात बोलत होत्या.     Vo - राधानगरी इथल्या दलित वस्तीमध्ये मधुरिमाराजे यांचा राधानगरी परिसरातील विविध ठिकाणी संपर्क दौरा झाला.यावेळी मधुरिमाराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात केलेल्या कामांचा आजच्या सातव्या पिढीला लाभ होतोय,त्यांचाच वसा आणि वारसा त्यांचे पणतु श्रीमंत शाहू महाराज यांनी जपलाय,मराठा आरक्षण,टोल आंदोलन आशा आंदोलनामध्ये सहभाग घेतला,कोल्हापूरातील शांतता यात्रेचं नेतृत्व महाराजांनी केलं,कोरोना आणि कोल्हापूरच्या पुरस्थितीतही योगदान दिलं.त्यांनी सामाज्यासाठी केलेली जाहिरात कधी केलेली नाही,राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची शिदोरी त्या

महिला अन्न सुरक्षा अधिकारी 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत पथकाच्या ताब्यात.

Image
  महिला अन्न सुरक्षा अधिकारी 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत पथकाच्या ताब्यात. --------------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------  कोल्हापूर - रेस्टॉरंट वर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याकडून २५,०००/-रू.लाच रक्कम स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. श्रीमती किर्ती धनाजी देशमुख.( रा. विश्व रेसीडेन्सी,फ्लॅट नं.२०२,ताराबाई पार्क कोल्हापूर, मूळ पत्ता रा. समर्थनगर, मोहोळ, ता.जि. सोलापूर.) असं त्यांचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे किणी, ता. हातकणंगले इथं मे.सम्राट फुडस नावाचे रेस्टॉरंट आहे. दि.१५ मार्च २०२४ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांच्या रेस्टॉरंट वर तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले होते. देशमुख यांनी रेस्टॉरंट कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांच्याक्डून १,००,०००/-रू.ची मागणी करून तडजोडीअंती ७०,०००/- रुपये लाच

लोहा शहरात स्वच्छतेचे तीनतेरा ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे तर नाल्या तुंबल्या.

Image
  लोहा शहरात स्वच्छतेचे तीनतेरा ; रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे तर नाल्या तुंबल्या. --------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि अंबादास पवार  ---------------------------  नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष    "स्वच्छ शहर.. सुंदर शहर" ही संकल्पना केवळ कागदावरच दिसून येत असून आजघडीला लोहा शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर कचऱ्याचा खच तर नाल्या कचरा व घाण पाण्याने तूंबल्या असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आणि नालीच्या घाण पाण्याने शहर वाशियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा ठेका लातूर येथील ठेकेदारास मिळाला असला तरी तो कागदोपत्री स्वच्छता दाखवून आणि टेबलवर चिरीमिरी ठेवून बिल काढून घेण्यात येत असल्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.             लोहा शहर हे प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण असून लोहा शहराचा संपूर्ण कारभार हा नगर परिषदेकडे आहे. जानेवारी महिन्यात पालिका कारभाऱ्याचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता पालिकेवर प्रशासक राज आहे. लोहा पालिकेला कायम मुख्याध

कोंबीग ओपॅरेशन दरम्यान 2 देशी बनावट पिस्टल, 3जिवंत काडतूस 1 रिकामे मॅगझीन, मोटार सायकल असा एक लाख पंच्यांनव हजार रुपयांचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी केला जप्त.

Image
  कोंबीग ओपॅरेशन दरम्यान 2 देशी बनावट पिस्टल, 3जिवंत काडतूस 1 रिकामे मॅगझीन, मोटार सायकल असा एक लाख पंच्यांनव हजार रुपयांचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी केला जप्त. -------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर ---------------------- पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोंबीग ओपॅरेशन राबवुन अभिलेखावरील गुन्हेगारांची तसेच अन्य संशयितांची झडती घेण्याच्या सूचना तसेच प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना ह्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर ( स्थानिक गुन्हे शाखा) यांस दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक अरुण फार्णे यांस पथक तयार करून सज्ज राहण्यास सांगितले. सातारा शहरातील गेंडामाळ आकाशवाणी ह्या ठिकाणी कोंबीग ऑपरेशन करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारमार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरातील शाहूपुरी ते आदर्श कॉलनी रस्त्यावर दोन इसम त्यांच्या काळ्या रंगाची मोपेड गाडी क्रमांक MH10. EF.7604 वरून गावठी बनावटीचे पिस्टल विक्

सांगली मतदारसंघाची जागा कशी गेली हे सर्वांना माहीती निवडणुकीनंतर याचा समाचार घेऊ वरच्या प्रचार सभेत विशाल पाटील यांचे वक्तव्य.

Image
  सांगली मतदारसंघाची जागा कशी गेली हे सर्वांना माहीती निवडणुकीनंतर याचा समाचार घेऊ वरच्या प्रचार सभेत विशाल पाटील यांचे वक्तव्य. ----------------------------------- फ्रंटलाईन न्यूज् महाराष्ट्र   मिरज कुपवाड प्रतिनिधी राजू कदम  ----------------------------------- सांगली मतदारसंघात काँग्रेसने लोकसभा जागा नाकारल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी स्वीकारत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना चिन्ह मिळतात दुसऱ्या मांसापासून 7उगु त्यांनी प्रचाराचा नारळ फोडत मतदार संघात भेट देत सर्व ठिकाणी प्रचाराचा धडा का लावला आहे आज विशाल पाटील यांची कुपवाड मध्ये प्रचार सभा पार पडली या सभेत विशाल पाटील यांनी प्रा. शरद पाटील सर यांच्या आठवणींना उजाळा देत मागच्या निवडणुकीत जिल्ह्यात पुरोगामी विचार जिवंत राहिला पाहिजे यासाठी माझ्यासाठी चा प्रचार सरांनी केला पुढे पाटील म्हणाले या निवडणुकीत कोणी काय केले सांगलीत जागा कशी गेली हे सर्वांना माहीत आहे निवडणूक झाल्यानंतर याचा समाचार घेऊ माघारी घेण्यासाठी खूप प्रस्ताव आले पण अशा गोष्टींना तळजोड केली तर वसंतदादाच्या नातू कसला अशा भूलथापांना बळी

लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी .. मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी गजाआड.

Image
  लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी .. मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी गजाआड. --------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  लोणंद प्रतिनिधी --------------------------- मोटार सायकली चोरी करणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या.        याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद पोलीस ठाणे हददीतील लोणंद ता. खंडाळा गावातुन मोटार सायकली चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासात वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.         दिनांक २३/०४/२०२४ रोजी यातील दोन आरोपीचा ठावठिकाण मिळताच मा. वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्ह

शिरोली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग लागून मोठे नुकसान.

Image
 शिरोली औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आग लागून मोठे नुकसान. ------------------------------ फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी  अमित खांडेकर  ------------------------------ शिरोली औद्योगिक वसाहतीतील श्री दत्त फौंडर्स ॲन्ड इंजिनिअर्स कंपनीत गुरुवारी, सायंकाळी शाॅर्ट सर्कीट मुळे  ट्रान्सफाॅर्मरला आग‌ लागली या आगीत कंपनीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा झाली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.  घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी शिरोली औद्योगिक वसाहतीतील बी ब्लाॅक मध्ये उद्योजक सुरज बोडके यांची श्री दत्त फौंडर्स ॲन्ड इंजिनिअर्स ही कंपनी आहे. नेहमी प्रमाणे कंपनीत काम सुरू होते. सायंकाळी ५ च्या सुमारास कंपनी समोरील ट्रान्सफाॅर्मर मध्ये शाॅर्ट सर्कीट होवून आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आणि आगीचे लोट बाहेर पडू लागले. कंपनीत आग लागल्याने कंपनीतील कार्यालयीन कर्मचारी आणि फौंड्री मधील कर्मचारी कंपनीतून बाहेर आले.  आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनी प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले

सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे वादळी वारे व पावसाच्या तडाक्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान.

Image
  सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे वादळी वारे व पावसाच्या तडाक्यामुळे  मोठ्या प्रमाणात नुकसान. ----------------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  सांगवडे प्रतिनिधी  विजय कांबळे ----------------------------------------------- करवीर तालुक्यातील सांगवडे येथे  कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या प्राथमिक शाळेचे काल संध्याकाळी झालेल्या वादळी वारे व पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शाळेतील चार वर्गाच्या खोलीवरचे पत्रे उडून गेले त्यामुळे शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.  शाळेत झालेल्या नुकसानाची माहिती कळताच सांगवडे गावचे सरपंच सौ. रूपाली कुंभार, ग्रामसेविका सारिका बंडगर, श्री विजय यादव (गट विकास अधिकारी पं.स.करवीर), श्री अमोल पाटील ( समग्र शिक्षण विभाग कार्यकारी अभियंता), श्री. चौधरी( शिक्षण विभाग बांधकाम). श्री संतोष पाटील( झोनल अधिकारी).ग्रा.पं.सदस्य श्री शितल भेंडवडे ,बाजीराव देसाई, उत्तम कुंभार, ग्रामपंचायतचे लिपिक अरुण सोनवणे, शालेय व्यवस्था समिती अध्यक्ष श्री अरुण जाधव, मुख्याध्यापिका सौ उमा साळुखे , व सर्व शिक्षकवृंद, माजी मुख्याध्

जावळीत घडले माणूसकीचे दर्शन.

Image
  जावळीत घडले माणूसकीचे दर्शन. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र मेढा प्रतिनिधी प्रमोद पंडीत ---------------------------------- श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वसंतगड येथे महायुतीचा महामेळावा होता तो मेळावा संपल्या नंतर जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब हे कार्यकर्त्यासहित रात्री आकरच्या दरम्यान कार्यक्रम उरकून आबेंघर येथील घरी जात असताना करंजे गावच्या हद्दीत एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्तेच्या मधोमध पडलेली दिसली लगेच गाडी थाबवून ती व्यक्ती कोण आहे हे मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता ती व्यक्ती त्याच्या ओळखीची वाटली तर ती व्यक्ती झेडपी कर्मचारी रवींद्र सपकाळ असल्याचे लक्षात आले सपकाळ हे चोराबे गावचे सुपुत्र आहेत माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचे नातेवाईक आहेत . रांजणे साहेबांनी लगेच रुग्णवहिकाला फोन लावला परंतु गाडी येण्यास वेळ लागणार म्हणून त्यांनी लगेच सपकाळ यांना स्वताःच्या गाडीत घेवून यशवंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेवून गेले .

वादळी पावसाच्या तडाक्यामुळे सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान.

Image
  वादळी पावसाच्या तडाक्यामुळे सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  हुपरी प्रतिनिधी   जितेंद्र जाधव  ------------------------------- करवीर तालुक्यातील सांगवडे येथे वादळी वाऱ्याच्या पावसाच्या तडाख्यामुळे कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या प्राथमिक शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शाळेच्या वर्गाच्या खोलीवरचे पत्रे उडून गेलेत तसेच शाळेसमोर असणाऱ्या पिकप शेड वरील पत्रे उडून गेलेत त्यामुळे शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले .  शाळेत झालेल्या नुकसानाची माहिती कळताच शिक्षक आशिष कांबळे सर व कोळी सर तसेच सांगवडे चे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सनी काशींबरे तसेच सांगवडे चे माजी सरपंच अशोक तिरपणकर गावातील नागरिक यांनी देखील शाळेची झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसेच शाळेसमोर असणाऱ्या विक्रम पाटील यांच्या घरावर झाड कोसळून किरकोळ नुकसान झाले. या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे सांगवडे गावातील विद्युत पुरवठा कोणता पूर्णतः बंद होता. लाईट नसल्यामुळे उद्या सकाळी विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व भागातील सर्व

मतदान करा...लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे आव्हान.

Image
  मतदान करा...लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे आव्हान. ----------------------------- फ्रंटलाईन  न्यूज महाराष्ट्र  लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  -----------------------------  लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  चिंचोलकर साहेब यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  स्वतः बंदोबस्तामध्ये व्यस्त असून निवडणुकीच्या कामकाजामध्ये व्यस्त असून वेळातला वेळ काढून त्यांनी जाऊन मतदान केले आहे.  भारताची लोकशाही ही  जगातील सर्वात जुनी लोकशाही असून जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.  भारतीय लोकशाहीने  जगासमोर एक लोकशाहीचा आदर्श घालून दिला आहे.  भारतातील निवडणुका या अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने पार पाडल्या जातात.  आपल्या लोकशाहीला अजून बळकटी आणण्यासाठी प्रत्येक अठरा वर्षाच्या वरील नागरिकांनी मतदान करणे हे अत्यंत आवश्यक आहे.  निवडणूक प्रक्रिया म्हणजे भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवांमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा.  आपल्याला आवडत असलेल्या कुठल्याही उमेदवाराला आपण मतदान करावे.  मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.  सुट्टी आहे म्हणून आपण बाहेर कुठेही न जात

शांताबाई कदम यांचे निधन.

Image
  शांताबाई कदम यांचे निधन. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे -------------------------------- राधानगरी तालुक्यातील कं थे वाडी येथील, ग्रामसेवक दिलीप बापसो कदम यांच्या मातोश्री शांताबाई कदम यांचे वयाच्या 77 वर्षी आकस्मित निधन झाले आहे त्यांच्यामागे दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन उद्या दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कं थे वाडी तालुका राधानगरी येथे होणार आहे

मतदानरुपी संधीचे मतदान करून सोने करा.जालिंदर देवकर समाजसेवक.

Image
  मतदानरुपी संधीचे मतदान करून सोने करा.जालिंदर देवकर समाजसेवक. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर --------------------------------- देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवार 26 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यात अकोला लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. प्रशासकीय स्तरावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तसेच विविध सामाजिक संस्था सुद्धा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही पन्नास टक्केपेक्षाही कमी आहे आणि ही लोकशाहीला चिंतेत टाकणारी बाब आहे. मतदारांचा हा निरुत्साह देशाच्या विकासासाठी बाधक आणि घातक ठरु शकतो. मतदान करणे हे आपले केवळ कर्तव्यच नव्हे तर तो प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. या अधिकाराचा उपयोग करून सर्वसामान्य माणसाने मिळालेल्या संधीचे सोनं कराव आणि आपल्या देशाप्रती आपल योगदान द्यावं असे आवाहन रिसोड शहरातील व्यावसायिक तथा समाजसेवक जालिंदर देवकर यांनी केले आहे.

ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Image
  ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. -----------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर ----------------------------  प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोड सेवा केंद्राचा चोविसावा वर्धापनदिन 24 एप्रिल बुधवारला उत्साहात साजरा करण्यात आला. रिसोड सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माउंट अबू राजस्थान येथे मुख्यालय असलेल्या ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राची शाखा रिसोड शहरात चोवीस वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती तेव्हापासून संचालिका ज्योती दिदी निरंतर ईश्वरीय संदेश देण्याची सेवा करित आहेत. अतिशय परिश्रमाने, आत्मविश्वासाने या सेंटरच्या विकासासाठी ज्योती दिदी नी मार्गक्रमण केले.अकोला वाशीम सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका राजायोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिनी दिदी व सुमन दिदी यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यामुळे रिसोड येथे सेवा करणे सहज शक्य झाल्याचे मनोगत ज्योती दीदींनी प्रसंगी व्यक्त केले.वर्धापन दिनाच्या निमित्ताने संचालिका ज्योत