महिलेच्या अर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेवुन वेश्या व्यवसाय चालवणा-या दोघांवर कारवाई.

 महिलेच्या अर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेवुन वेश्या व्यवसाय चालवणा-या दोघांवर कारवाई.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शशिकांत कुंभार 

--------------------------

बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल रसना लॉजींग, बोर्डींग व गार्डन येथे छापा टाकुन वेश्या व्यवसाय चालविणारे  भगवान पांडुरंग भाकरे, वय -45 वर्षे, रा. हॉटेल रसना लॉजींग-बोर्डींग व गार्डन, पन्हाळा व शुभम झुंजारराव जाधव, वय -26 वर्षे, रा. मनेर माळ, उचगांव ता. करवीर यांना शिताफीने ताब्यात घेतले व एका पिडीत महिलेची सुटका केली. सदर छापा कारवाई मध्ये रोख रक्कम, २ मोबाईल हॅन्डसेटस्, १ रजिस्टर, १ निरोधचा बॉक्स व १ वाहन असा एकुण 32,036/-रु. किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. बोगस गि-हाईक पाठवून हि कारवाही करण्यात आली.

लॉज मालक भगवान भाकरे.

 कारवाई मधील पिडीत महिला यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी आपली अर्थिक परिस्थीती बेताची असुन गरजेपोटी आपण आरोपी भगवान भाकरे याचे सांगणे प्रमाणे शरिरगमनासाठी ग्राहकां सोबत जात असतो व प्रत्येक कामा मागे नागेश हा आपणास 1000/-रु. देत असतो अशी हकिकत सांगितली. छापा कारवाई अंति आरोपी भगवान पांडुरंग भाकरे व शुभम झुंजारराव जाधव यांचे विरुध्द भा.द.वि.सं.कलम 370, 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे पन्हाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन ते दोघे पन्हाळा पोलीस ठाणे येथे अटकेत आहेत. त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, कोर्ट- पन्हाळा यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दि.18/03/2024 अखेर पोलीस कोठडी मंजुर केली आहे.



सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत अप्पर पोलीस अधीक्षक  निकेश खाटमोडे-पाटील, श्रीमती जयश्री देसाई व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शना खाली पन्हाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक  महेश इंगळे, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार कोल्हाळ, सहा. फौजदार राजेंद्र घारगे, पोलीस हवालदार अभिजीत घाटगे, रफिक आवळकर, अश्विनी पाटील व म.पो. कॉ. तृप्ती सोरटे यांनी केली आहे.


चौकट:पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने महेश इंगळे, पोलीस निरीक्षक, पन्हाळा पोलीस ठाणे व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, कोल्हापूर कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार कोल्हाळ असे त्यांचे कडील स्टाफसह पन्हाळा येथे पेट्रोलींग करुन माहिती घेत असता सहा. फौजदार राजेंद्र घारगे व पो.हे.कॉ. 1699 अभिजीत घाटगे यांना माहिती मिळाली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.