पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हरिश्चंद्र येथे महाविकास आघाडी तर्फे आयोजित महासभा एकजुटीचे भव्य शेतकरी मेळावा या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हरिश्चंद्र येथे महाविकास आघाडी तर्फे आयोजित महासभा एकजुटीचे भव्य शेतकरी मेळावा या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
-------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------
आत्ताच ज्याचे आपण विचार ऐकले ते सामनाचे संपादक आणि माझे राज्यसभेचे सहकारी श्री संजय राऊत ही विराट सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केली ते आपल्या सर्वांचे आमदार श्री संग्राम थोपटे माजी मंत्री आमदार श्री बाळासाहेब थोरात लोकसभेसाठी तुम्हा सर्वांच्या उमेदवार सौ सुप्रिया सुळे व्यासपीठावरील शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सर्वांचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भोर व अन्य भागातील माझे सर्व बंधू भगिनींना..
निवडणुका जाहीर होतील माझ्या अंदाजे उद्याच्या 14 15 तारखेत निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीत चा कार्यक्रम हातात घेईल निवडणूक येईल तेव्हा या देशाचे भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्यासाठी आता थांबायला वेळ नाही आणि या हेतूने संग्राम थोपाट्यांनी सांगितले तसे आपण भर पासून सुरू करूया आणि मला आनंद आहे की आज आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ही निवडणूक तुम्ही सर्वांचा दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे.
स्वतंत्र नंतर अनेकांनी देशाचे नेतृत्व केले जवाहरलाल नेहरू असतील लालबहादूर शास्त्री असतील इंदिरा गांधी होत्या मोरार्जी देसाई होते नरसिंह होते अटल बिहारी वाजपेयी होते अनेकांची नावे घेता येतील मनमोहन सिंग सारखे प्रधानमंत्री होते पण या सर्व काळात देशाच्या भवितव्याचे चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी आली नाही पण गेले दहा वर्षे या देशाची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे आणि ज्या पद्धतीची पावले त्यांनी टाकले आणि त्याचे परिणाम आज तुम्ही आम्ही ठीक ठिकाणी पहात आहोत हे पाहिल्यानंतर परिवर्तन शिवाय पर्याय नाही इथे बदल केला पाहिजे ही भूमिका देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न दहा वर्ष माझ्याकडे देशातल्या शेतीचे काम होते मला आठवतंय राष्ट्रपती भवनावर शपथ घेतली शपथ घेऊन घरी आलो पहिली फाईल आली त्या फाईल मध्ये होतं की देशामध्ये एक महिना पुरेल एवढं गहू आणि तांदूळ आहे. लोकांच्या समोर भुकेचा प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्यासाठी प्रदेशातून धान्य आयात करावे लागेल मी फार अस्वस्थ झालो. शेती या देशातील बहुसंख्या लोकांच्या व्यवसाय आहे आमचा बळीराजा उन्हा- तानाचा विचार न करता घाम गाळतोय पिकवतोय देशाच्या भूमिकेच्या प्रश्न सोडवत आहे आणि आज त्यांच्या या देशात धान्य कमी झालेले आहे . आणि मग ठरलं की प्रदेशातून धान्य आणणे हे बंद केले पाहिजे अनेक निकाल घेतले आणि देशाचे चित्र बदलले .
आज तुम्ही सर्वांसमोर उमेदवार म्हणून सुप्रिया यांची उमेदवारी या ठिकाणी मी देतो तुम्ही सर्वांनी तिला कायमच निवडून दिला आहे . काम करण्यासाठी ज्याचे नाव लौकिक आहे त्यामध्ये तुमच्या उमेदवाराचे नाव आहे आज प्रकर्षांने 98% हजेरी पार्लमेंट मध्ये ज्याचे आहे त्यामध्ये तुमच्या उमेदवाराचे नाव घेतले जाते आणि उत्तम पार्लमेंटच्या सभासद म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही तर सात वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार तुमच्या सर्वांसमोर आहे म्हणून त्यांना भरगच्च मतांनी निवडून देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे आहे की संग्राम थोपटे यांच्या हातामध्ये तुम्ही या तालुक्याचे नेतृत्व दिले या सर्व भागातील लोकांचे जे काही दुखणे असेल ते दूर करण्याची दृष्टीने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आज तुम्ही सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो संग्राम तुम्ही जे काही या तालुक्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या पाठीशी शरद पवार हा कायम उभा राहील . पर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याने गेलो असून पण इथून पुढे शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन दाखवू शकलो हे दाखवल्याशिवाय मी राहणार नाही.
हा विश्वास भोर तालुक्याच्या जनतेला देतो आणि त्याच्यासारखा तरुण कार्यकर्त्याला एक प्रकाराचे काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र...
Comments
Post a Comment