निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने लोहा पोलिसांची शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी.

 निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने लोहा पोलिसांची शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि

अंबादास पवार 

--------------------------------------

60 वाहने जप्त अनेक वाहनांची चेकिंग विदाऊट लायसन विदाऊट आरसी बुक विदाऊट नंबर फॅन्सी नंबर अशा वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

 गाडीवर नंबर न टाकणारे संशयास्पद वाहने अशी लोहा पोलिसांनी एकूण 60 वाहने जप्त केली. गाडी मालक त्याचे आधार कार्ड गाडीची कागदपत्र पाहूनच खात्री करूनच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनच सदरच्या गाड्या सोडण्यात येत आहेत.


 दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी ब्रेक आनालायझर मशीन चा वापर करण्यात येत आहे.

 सदर नाकाबंदी दरम्यान 14 लोकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी करण्यात आली.


 वाहनामध्ये दारू पैसा साहित्य वाहतूक होत आहे का याबाबत विशेष करून चेकिंग सुरू आहे.

 आचारसंहितेचा भंग करणाऱ्या कुठल्याही कृतीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.