गरीब कुटुंबाच्या घराला भीषण आग; प्रशांत गोळे यांचा मदतीचा हात.
गरीब कुटुंबाच्या घराला भीषण आग; प्रशांत गोळे यांचा मदतीचा हात.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------
. तालुक्यातील नेतंन्सा येथील गरीब कुटुंबाच्या तिन घरांना अचानक लागलेल्या आगीत घरांची राखरांगोळी तर झालीच, अन्नधान्य व सर्व साहित्याचाही कोळसा झाला, व घर बांधणीसाठी घरात असलेला ९० हजार रु रक्कम जळून खाक झाली उघड्यावर आलेल्या या कुटुंबांच्या मदतीला ऐनवेळी प्रा. प्रशांत गोळे पाटील धावून आले व त्यांनी आगग्रस्तांचे सांत्वन करून प्रत्येकी दहा हजार रु तिन्ही कुटुंबांना ३० हजार रू तत्काळ आर्थिक मदत दिली.
नेतंन्सा येथील लक्ष्मी नारायण महाविद्यालय नजीक बागवान कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यावेळी आग लागल्याचे लक्षात येताच सर्वांनी घराबाहेर पळ काढला. व वेळेवर सावधान की दाखवत घरातील असलेले गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढले त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. गावकऱ्यांनी पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले;परंतु आग एवढी भीषण होती की संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यात अन्नधान्य व सर्व सामानाचा कोळसा झाला. बाजूला असलेल्या गोठ्यात बैलांना देखिल आगीची वाफ लागून जखमी झाले असुन साठवून ठेवला कुटार पूर्णतः खाक झाला आहे.तसेच या कुटुंबातील महिला शिवणकाम करायच्या ईद साठी मोठ्या संख्येने यांच्याकडे गावातील मंडळींचे कपडे शिवण्याकरिता आले होते.ते देखिल जळून खाक झाले आहे.जावेद बागवान, अजीस बागवान व सादिक बागवान यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले व त्यांचा संसार उघड्यावर आला. त्यांची राहण्याची तर सोडाच जेवणाचीही सोय नव्हती. ही माहिती कळताच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामसेवक विलास शिंदे व तलाठी मनोज केनवडकर यांनी पंचनामा केला; व सदर घटना प्रशासनाला कळविली यावर योग्य ती मदत मिळण्याची कार्यवाही होईल अशी प्रशासनाच्या वतीने ग्वाही दिली.यावेळी आगीमुळे होरपळलेल्या कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून प्रशांत गोळे पाटील हे या कुटुंबांच्या मदतीला धावून आले. त्याचे सांत्वन करून तत्काळ प्रत्येकी दहा हजार रुपये असे तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली व शासकीय अधिकाऱ्यांना फोनलावून लवकर मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. प्रशांत गोळे यांच्या या तत्काळ आर्थिक मदतीमुळे आगग्रस्त कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी बागवान कुटुंबातील सदस्यांनी गोळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राजू पाटिल बाजड, जिवन पाटील वानखेडे, विठ्ठलराव बाजड, सुनील बाजड ,गजानन काळे, शेख बशीर,विवेक वानखेडे,सय्यद समीर ,सय्यद आवेश, शेख असलम, हसन बागवान, महेबुब बागवान, वसीम पठाण, सह बहूसंख्य गावातील मंडळी उपस्थित होती.
Comments
Post a Comment