अल्फिया बागवान यांना आंतरराष्ट्रीय आयरन लेडी अवार्ड जाहीर.
अल्फिया बागवान यांना आंतरराष्ट्रीय आयरन लेडी अवार्ड जाहीर.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी
रजनी कुंभार
--------------------------------------
कोल्हापूर: दुबई,यु.ए.ई. येथील एज्युफॉर्म इंटरनॅशनल अकॅडमी तर्फे भारतातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना आयरन लेडी अवार्ड देऊन गौरविण्यात येते.
यावर्षीचा हा पुरस्कार कोल्हापूर मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील प्रफुल्लीत केंद्राच्या संचालिका अल्फिया महंम्मद बागवान यांना जाहीर करण्यात आला.नुकताच महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिला पुरस्कार व युवा उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
अल्फिया मोहम्मद बागवान यांनी आजपर्यंत जवळजवळ पाचशे च्या वर महिलांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण दिले आहे. महिलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रफुल्लीत केंद्राची स्थापना केली. या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात.
महिलांचा क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, मोफत लाठीकाठी प्रशिक्षण, लेझीम, आरोग्य शिबिर, योगा, दुचाकी प्रशिक्षण, मोफत कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन, गरजूंना खाऊ वाटप, गरिबांना कपडे वाटप, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, मोफत ग्रंथालयाची स्थापना इत्यादी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार वितरणाचा सोहळा दुबई येथे पंचवीस मे रोजी संपन्न होणार आहे.
हा पुरस्कार मिळण्यासाठी संस्थापक प्रफुल्ल पाटील, आई मीनाज बागवान वडील मोहम्मद बागवान, प्रफुल्लीत केंद्राच्या सहाय्यक शिक्षिका रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ, श्रावणी लाड, साक्षी कांबळे तसेच कॉमर्स कॉलेजमधील शिक्षक स्टाफ चे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
Congratulations 👏🎉
ReplyDelete