जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका.

 जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका.

दररोज 35 ते 60 लाखांची उलाढाल, अनेकांचे संसार देशोधडीला : पोलिस ठाण्याचे दुर्लक्ष.

जयसिंगपूर पोलिस ठाण्याअंतर्गत , उदगाव , संभाजीपूर, जयसिंगपूर ,राजीवगाधीनगर,दसरा चौक,राणी बागेत ,नांदणी नाका,नवजीवन हायस्कूल जवळ,

आहेत. यात दररोज 35 ते 60 लाख रुपयांचे कलेक्शन आहे. महिन्याला काही वरिष्ठ व त्यांचे प्रमुख सहकारी यांना ठरलेला वाटा जातो.

असा गंभीर प्रकार सुरू असतान पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने जयसिंगपूर पोलिस ठाणे हद्दीतील गावांतील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मटक्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले, कुटुंबे आर्थिक कोंडीत सापडत आहेत. 

जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका सुरू आहे. यातून दररोज 35 ते 60 लाखांची उलाढाल होत आहे. याचा केंद्रबिंदू जयसिंगपूर असून, येथून १० गावांतील मटका बुक्या चालविल्या जात आहेत. याकडे जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे दुर्लक्ष असून, अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत. जिल्हा पोलिसप्रमुखांनी जयसिंगपूर परिसरातल मटका मोडीत काढून जयसिंगपूर ला अवैध धंद्यांपासून मुक्त करावे असे नागरिका कडून मागणी होत आहे..त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखांनी जयसिंगपूर परिसरातील मटका बुक्या मोडीत काढाव्यात, अशी मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.