मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका ,कारखानदारांना पाठीशी घालू नका.
मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका ,कारखानदारांना पाठीशी घालू नका.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वडगांव प्रतिनिधी
-------------------------------
गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन १०० रूपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगांव हातकंणगले रोडवर काळे झेंडे दाखविण्यात आले.
राज्य सरकारने दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर १०० रूपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वत: मध्यस्थी करून पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते. जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी १०० रूपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे साजर केले आहेत. मात्र राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे.
जवळपास ३ महिने झाले तरीही शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनार्थ डिजीटल बोर्ड तयार केला होता. या बोर्डवर १०० रूपयाचा दुसरा हप्ता बुडवून , एफ. आर पी चे तुकडे करून शेतक-यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार , मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका ,कारखानदारांना पाठीशी घालू नका ।ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या अशा आशयाचे फलक दाखविण्यात आले.
Comments
Post a Comment