गांधीनगरच्या उपसरपंचपदीविनोद हजूराणी यांची निवड तर माजी सरपंच रितू लालवानी पराभवामुळे महाडिक गटाला धक्का.

 गांधीनगरच्या उपसरपंचपदीविनोद हजूराणी यांची निवड तर माजी सरपंच रितू लालवानी पराभवामुळे महाडिक गटाला धक्का.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------

 गांधीनगरच्या उपसरपंचपदी बंटी पाटील गटाचे विनोद हजूराणी यांची निवड झाली. त्यांना अकरा मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार रितू लालवानी यांना केवळ सहा मतावर समाधान मानावे लागले. माजी सरपंच रितू लालवानी यांच्या पराभवामुळे हा निकाल महाडिक गटाला धक्का देणारा ठरला.

गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये महाडिक गटाचे सरपंचसह  नऊ सदस्य आहेत, तर विरोधी बंटी पाटील गटाचे नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत. उपसरपंच पदासाठी विनोद हजुराणी आणि रितू लालवानी यांच्यात लढत झाली. त्यात हजुरानी अकरा मतानी विजयी झाले. एक मत बाद झाले. महाडिक गटातील  फुटीचा बंटी पाटील गटाने लाभ उठवला. व रितू लालवानी  यांचा पराभव महाडिक गटाला धक्का देणारा आहे. बंटी पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्य सनी चंदवानी व निवास तामगावे व अन्य सदस्यांनी हजुरानी यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप पाटोळे होते तर या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामसेवक रांझा पाटील यांची उपस्थिती होती. निवड प्रक्रिया झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.