पारा पोहचला चाळीशी पार, नागरिक उकाड्याने हैराण.

 पारा पोहचला चाळीशी पार, नागरिक उकाड्याने हैराण.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर.

---------------------------

रिसोड तालुक्यातील कमाल तापमानामध्ये झपाट्याने वाढ झाली असून आज दिनांक 28 मार्च रोजी तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे अजूनही उष्णतामान वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

        मागील आठवडाभरापासून तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत आज दिनांक 28 मार्च. रोजी कमाल तपमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले त्यामुळे दिवसभर शरीराची लाही लाही झाली तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील पंधरवड्यापूर्वी ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरण दमट झाले होते त्यानंतर मागील चार-पाच दिवसापासून मात्र तापमानामध्ये अचानक वाढ झाली आहे मागील दोन दिवसापासून तापमानामध्ये कमालीची वाढ झाली असून पारा चाळीशी पार पोहोचला आहे एप्रिल महिन्यामध्ये उकाड्याला तोंड द्यावे लागणार आहे उन्हामुळे थंड पदार्थाच्या मागणीतही वाढ झाली आहे होळी नंतर उष्णता मानामुळे बाजारपेठेत वर्दळ कमी दिसत आहे वातावरणातील अचानक बदल व तापमानात अचानक झालेली वाढ थंड पदार्थाची सेवन यामुळे नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अजूनही तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे

चौकट.

लहान मुलांना बर्फ किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ देऊ नयेत पुन्हा पासून संरक्षण करण्याकरता डोक्याला सुती कपडा व गॉगल चा उपयोग करावा लिंबू शरबत कैरीचे पन्हे व इतर द्रव पदार्थाचा पुरेपूर वापर करावा तसेच लहान मुलांनापाणी भरपूर द्यावे बाहेरून आल्यावर कुलर किंवा एसी चा वापर करू नये तसेच एसी किंवा कुलर असलेल्या घरातून लहान मुलांना उन्हामध्ये जाऊ देऊ नये.

डॉ. प्रताप डव्हळे,

बालरोग तज्ञ, रिसोड.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.