महापालिका क्षेत्रात स्विप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती.

 महापालिका क्षेत्रात स्विप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

राजू कदम

 ----------------------------------

सांगली दि 22 ( जि मा.का. ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे

निवडणुकीत मतदानाच टक्का वाढवण्यासाठी महापालिका क्षेत्रात स्विप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे .

मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सांगली नेमण्यात नगर मैदान सांगली शांतिनिकेतन महाविद्यालय वालचंद कॉलेज सांगली या ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती करण्यात आले  

भारतीय मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सांगली येथे  व्होटर  (voter)  हेल्पलाइन या ॲपद्वारे मतदान नोंदणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले नेमण्यात नगर येथे मतदार जनजागृती चे स्टॉल लावून त्या ठिकाणी युवा मतदारांची नोंदणी मतदार यादीतील नावे तपासणी तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी युवकांना प्रोत्साहित केले व नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी असणाऱ्या फॉर्मचे वाटप केले शांतिनिकेतन महाविद्यालय व वालचंद कॉलेज सांगली येथील चित्र कला स्पर्धा आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आले.

या कार्यक्रमांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अप्पर जिल्हाधिकारी डॉ स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील महापालिका क्षेत्राचे स्विप नोडल अधिकारी  तथा मनपा आयुक्त वैभव साबळे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांचे उपस्थिती होती ‌‌....

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.